गृहमंत्र्यांच्या दाव्यामुळे इम्रान खान यांचा पाय आणखी खोलात जाणार?

गृहमंत्र्यांच्या दाव्यामुळे इम्रान खान यांचा पाय आणखी खोलात जाणार?

Imran Khan News : अल-कादीर ट्रस्ट प्रकणात फसवणूक केल्याचा आरोप असलेले पाकिस्ताने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. कारण पाकिस्ताचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी हिंसाचाराप्रकरणी इम्रान खान यांच्यावर लष्करी न्यायालयलात खटला चालवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात जाऊ’; विदर्भातील गावांचा सरकारला इशारा

इम्रान खान यांच्यावर अटकेपूर्वी लष्करी छावण्यांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे असल्याचंही राणा सनाउल्ला यांनी सांगितलं आहे. लष्करी छावण्या टार्गेट करुन हिंसाचार केल्याने इम्रान खान यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालवण योग्य असल्याचंही राणा यांनी स्पष्ट केलंय.

सत्तेचा माज चांगला नसतो; गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडीवर घणाघात

इम्रान खान यांनी अटेकपूर्वीच लष्करी छावण्यांवर हल्ले करण्याबाबतचे नियोजन केले होते. मला अटक करण्यासाठी जेव्हा पोलिसांचा फौजफाटा येईल तेव्हा नागरिकांनी काय केलं पाहिजे, कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, यासंदर्भात आधीच पूर्वनियोजित होतं, असंही गृहमंत्री राणा यांनी सांगितलं आहे.

आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?

दरम्यान, अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण 2019 मध्ये सूफीवादासाठी अल-कादिर विद्यापीठाच्या स्थापनेशी संबंधित आहे. , माजी पंतप्रधान इम्रान खान, पत्नी बुशरा बीवी, सहकारी झुल्फिकार बुखारी आणि बाबर अवान यांनी अल-कादिर प्रोजेक्ट ट्रस्टची स्थापना केली होती.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातली झेलम इथल्या सोहावा तहसीलमध्ये उच्चस्तरीय शिक्षण देण्यासाठी अल-कादिर नावाचे विद्यापीठ स्थापन करणे हा उद्देश होता. दान केलेल्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube