Shinde VS Thackeray : शहाजी बापूंच्या किडन्या फेल होऊ दे विठुराया, ‘या’ माजी खासदाराची जीभ घसरली

सोलापूर : शहाजी बापूंना कर्करोग होवो, त्यांच्या किडण्या जावो आणि त्याचा इलाज भारतात कोठेही ना होवो अशी प्रार्थना मी पांडूरंगाला करतो. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल असं धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे शिरोळचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केलं आहे ते पंढरपूरमध्ये सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांची आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका करताना जीभ […]

Shahjibapu

Shahjibapu

सोलापूर : शहाजी बापूंना कर्करोग होवो, त्यांच्या किडण्या जावो आणि त्याचा इलाज भारतात कोठेही ना होवो अशी प्रार्थना मी पांडूरंगाला करतो. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल असं धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे शिरोळचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केलं आहे ते पंढरपूरमध्ये सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांची आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका करताना जीभ घसरली.

पुढे ते असं देखील म्हणाले की, अशा लबाड लोकांना आपण माफ करणार का ? शहाजी बापू गेले तर जाऊ द्या. त्याचवेळी बोलताना माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जीभ घसरली आणि त्यांनी शहाजी बापूंना कर्करोग होवो, त्यांच्या किडण्या जावो आणि त्याचा इलाज भारतात कोठेही ना होवो अशी प्रार्थना मी पांडूरंगाला करतो. मग कळते काय झाडी, काय डोंगर. भगवान के घर देर है अंधेर नही. यांना पांडूरंग नक्की बघेल. असं धक्कादायक वक्तव्य केलं.

Sushma Andhare : एकनाथ शिंदे फक्त कळसुत्री बाहुली, फडणवीस खरे सूत्रधार

सध्या ठाकरे गटाकडून राज्यभर शिवगर्जना अभिययान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमध्ये संत तनपुरे महाराज मठ येथे मेळावा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे शिरोळचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जीभ घसरली.

Exit mobile version