“निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल.” अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.
प्रजसत्ताक दिनानिमित्त “मूठभरांची जावो, प्रजेची सत्ता येवो!” अशा हेडिंगखाली लिहलेल्या अग्रलेखामधून विविध मुद्दयांवरून सरकारला घेरण्यात आलं आहे. सालाबादप्रमाणे आजच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनीदेखील राष्ट्रपतींचे लाल किल्ल्यावरील भाषण आणि इतर सरकारी सोपस्कार पार पडतील, पण ज्या जनतेचे हे प्रजासत्ताक आहे, त्या जगण्या-मरण्याचे जे असंख्य प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे त्यातून मिळणार आहेत का? असा प्रश्न देखील या लेखामधून विचारण्यात आला आहे.
याच लेखामध्ये पुढे म्हटले आहे की, “घटनाविरोधी कारवाया करून विरोधी पक्षांची सरकारे उलथविली जातात, घटनाबाहय़ सरकारे आणली जातात. पक्षपाती निर्णय घेऊन एका राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जातात. या दडपशाहीलाच प्रजासत्ताक म्हणावे काय?”
https://www.youtube.com/watch?v=AugKDU_KXTE