Download App

Letsupp Special : ‘सत्यजित तांबे यांचे काम करा, हे मला थोरातांनी सांगितलेले नाही’

  • Written By: Last Updated:

Nashik Graduate Constituency: नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना पाठिंबा देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब (Balasaheb Salunkhe) साळुंखे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. साळुंखे यांच्याशी लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. सत्यजित तांबे यांना का पाठिंबा दिला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले होते का ?, साळुंखे यांची पुढील भूमिका काय आहे. यावर त्यांनी उत्तरे दिली आहेत.

पदावरून हटविण्याचे कारण काय ? यावर साळुंखे म्हणाले, काँग्रेसने निलंबित करण्याअगोदर, मी पदाचा राजीमाना दिला आहे. सुधीर तांबे, सत्यजित तांबेंना पक्षाने निलंबित केले आहे. मी त्यांना उघड पाठिंबा दिला आहे. जिल्हा काँग्रेस सत्यजित यांच्या पाठीशी आहे. त्यानंतर पक्षाने मला कारणे दाखवा नोटीसा काढली होती. मी खुलासा देण्याएेवजी, राजीनाम्याचे पत्र पोस्टाने पाठवून दिले आहे. तांबे, थोरात यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली नाही. उलट सत्यजित तांबेंना उमेदवारी न देऊन पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांच्यावर शंभर टक्के अन्याय केला आहे. त्याच्या निषेध म्हणून मी राजीनामा दिला आहे.

बाळासाहेब थोरातांना सांगितले होते का तांबेंना पाठिंबा द्या ? यावर साळुंखे म्हणाले, थोरातांनी काही सांगितले नाही. ते आजारी असल्याने बोलणे झालेले नाही. मी वैयक्तिक पातळीवर, कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजीमाना दिला आहे. सत्यजित तांबे भाजपबरोबर गेले तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही.

सत्यजित तांबे यांच्या बंडाला थोरातांची फूस आहे का ? या प्रश्नावर साळुंखे म्हणाले, सत्यजित तांबे हा एक चांगला माणूस आहे. युवक काँग्रेस अध्यक्षाला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. ही परंपरा आहे. सत्यजित तांबेंबाबत अन्याय पक्षाने का केला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

थोरातांनी शब्द टाकला असता तर पक्षाने तांबेंना उमेदवारी दिली असती, यावर साळुंखे म्हणाले, हा जर तरच प्रश्न आहे. त्याला अर्थ नाही. उमेदवार नाकारण्याबाबत काही ठराविक लोक आहेत. जिल्ह्यातून काही जण आहेत. वरती काही बसलेले आहे. त्यांचा राग सत्यजित एेवजी थोरात यांच्यावर आहे. थोरातांना कोंडीत पकडण्यासाठी उमेदवारी नाकारली आहे. भाच्याच्या माध्यमातून थोरातांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा साळुंखे यांनी केला आहे.

सत्यजित यांच्या उमेदवारीला थोरात यांचा विरोध नव्हता. तांबे-थोरात हे एकच कुटुंब आहे. त्याला विरोध का असावा. चांगल्या युवक नेत्याला मागे का बसवतात हे पक्षाला आमचे म्हणणे असल्याचे साळुंखे म्हणाले.

भाजपने तांबेंना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. भाजप नेत्याच्या शिक्षणसंस्था प्रचारात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, ज्या शिक्षणसंस्था आहे, त्या कुठल्याही तरी नेत्याच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मतदान आहे. त्या ठिकाणी जाण्याची गरज आहे. मत मागायचे आहे. थोरात यांच्या मौनाबाबत ते म्हणाले, त्यांच्या मौनाचा अर्थ काय आहे ते ३० तारखेनंतर सांगू, याबाबत थोरात यांच्याशी चर्चा करू.

सत्यजित तांबेंनी काँग्रेसमध्येच रहावे
सत्यजित तांबेंनी काँग्रेसमध्ये राहायला पाहिजे. मी त्यांच्याशी बोलले आहे. उमेदवारी नाकारले असली तरी जन्मापासून काँग्रेसची नाळ जोडलेली आहे. ते नाकारून चालणार नाही. पक्षाने उमेदवार दिली असते. त्यांना कोरा एबी फॉर्म दिला असता तर त्यांनी बंडखोरी केली नसती, असा दावा साळुंखे यांनी केला आहे. विनायक देशमुख वगळता सर्वच जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा तांबेंना पाठिंबा असल्याचे साळुंखे म्हणाले. थोरात कुटुंब कोणाबरोबर महाविकास आघाडीबरोबर की सत्यजित तांबेंवर यावर साळुंखे यांनी ते दवाखान्यात आहे, असे उत्तर दिले आहे.

शुभांगी पाटलांचा स्टंटच
थोरात यांच्या संगमनेर येथील घरी जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांनी स्टंट केला असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला थोरात भेटले नाही, यावर साळुंखे म्हणाले, ते घरीच नाहीत. थोरात व त्यांचे कुटुंब हे मुंबईत आहे. थोरात व त्यांचे कुटुंब घरी नसल्याचे वॉचमनने पाटील यांना सांगितले होते. त्यानंतरही त्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. हा शुंभागी पाटील यांचा स्टंट आहे.

Tags

follow us