Download App

Live Update : बाळासाहेबांशी नातं रक्तानं होत नाही ते विचारांनी करावं लागत; Devendra Fadnavis यांच ट्विट

  • Written By: Last Updated:

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत.

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Jan 2023 01:31 PM (IST)

    ज्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मारू दिला जाणार नाही

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर करत आदरांजली वाहिली आहे. या व्हिडीओमधून त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, "बाळासाहेबांशी नातं रक्तानं होत नाही ते विचारांनी करावं लागत, विचारांशी नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. त्यामुळे जो या विचारांशी नातं सांगेल तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल. ज्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मारू दिला जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच मार्गदर्शन आम्हाला कायम लाभत राहो."

  • 23 Jan 2023 01:12 PM (IST)

    PM Modi : पंतप्रधान मोदींकडून बाळासाहेबांच्या आठवणीला उजाळा, म्हणाले...

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहले आहे की, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. बाळासाहेंबांसोबत झालेल्या माझ्या विविध चर्चा आणि गप्पा नेहमी लक्षात राहतील. उत्तम ज्ञान आणि अमोघ वकृत्वाची देणगी बाळासाहेबांना लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले"

  • 23 Jan 2023 12:25 PM (IST)

    “साहेब, मला क्षमा करा!” बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही पत्र लिहित बाळासाहेबांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना भेटू शकलो नाही, याची खंत असल्याचेही त्यांनी पत्रात लिहले आहे.

    सविस्तर माहितीसाठी वाचा

    https://letsupp.com/job/uncategorized/shakhapramukh-to-chief-minister-this-journey-is-only-because-of-balasaheb-narayan-ranes-emotional-letter-/6735.html

  • 23 Jan 2023 12:21 PM (IST)

    तैलचित्राचं अनावरण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार, आदित्य ठाकरेंची टीका

    औरंगाबाद : आज विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचं अनावरण होणारंय. त्यापूर्वीचं या सोहळ्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळताहेत. त्यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाताहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय.

    सविस्तर वाचा

    https://letsupp.com/politics/the-oil-painting-will-be-unveiled-by-the-chief-minister-outside-the-constitution-aditya-thackeray-criticizes-/6680.html

  • 23 Jan 2023 12:15 PM (IST)

    “जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात"

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटीविष्य स्वत: राज ठाकरे सांगतानाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.

    सविस्तर वाचा :

    https://letsupp.com/politics/mns-paid-tribute-to-balasaheb-by-sharing-the-video-ja-fight-i-am-/6702.html

Tags

follow us