Devendra Fadnavis on Poonam Mahajan : उत्तर मध्य मुंबईच्या भाजपच्या खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्याऐवजी भाजपने वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी दिली. महाजन यांना डावलल्याने उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. गद्दारांच्या मुलांना उमेदवारी मिळते, मात्र भाजपसाठी आयुष्य घालणाऱ्या महाजनांच्या मुलीला उमेदवारी मिळत नाही, अशी टीका ठाकरेंनी केली. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्याचं कारन सागितलं.
संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी ठाकरेंनाही ब्लॅकमेल केलं; नितेश राणेंचा पलटवार
देवेंद्र फडणवीस यांनी एक हिंदी यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. भाजपने पूनम महाजन याचं तिकीट का कापलं? असा सवाल केला असता ते म्हणाले की, पूनम महाजन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही बघितलं असेल अनेक राज्यात जे खासदार आहेत, ते विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. जे आमदार आहेत, ते खासदारीची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं असा मुद्दा उपस्थित झाला की, काही खासदारांनी आपण राज्यामध्ये पाठवलं पाहिजे, कारण लवकरच तिथे निवडणुका होणार आहे. त्यामुळं हा निर्णय झाला आहे. कुणाचेही तिकीट कापण्यात आलं नाहाी.
पूनम महाजन यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे का? या प्रश्नावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, ते माझ्या हातात नाही. पण, पूनम महाजनांना पक्ष रिकामं ठेवणार नसल्याचं फडणवीस म्हणाले.
पूनम महाजन भाजपकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. त्या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. 2006 मध्ये प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर त्या भाजपमध्ये सक्रिय झाल्या. 2009 मध्ये त्यांनी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तावडे काय म्हणाले?
विनादे तावडे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देतांना पूनम महाजन यांच्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, प्रत्येक नेत्याविषयी पक्षाची काहीतरी योजना असते. मला देखील 2019 मध्ये तिकीट नाकाण्यात आलं होतं. मात्र, आज मी पक्षात एका पदावर काम करत आहे. त्याचप्रमाणे पूनम किंवा मनोज कोटक यांच्याबद्दलली पक्षाचं काहीतरी नियोजन असू शकतं.