Download App

बारशाला गेला आणि बाराव्याला आला…, मराठीत नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Modi Rally In Wardha For Loksabha Election 2024: दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि वर्ध्यातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली.

मराठीत भाषणाला सुरुवात करत नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील जाहीर सभेत काँग्रेससह (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात माझ्यासाठी गॅरंटी फक्त तीन शब्द नाही, तर देशासाठी प्रत्येक क्षण देण्याचे लक्ष असल्याचे म्हटले आहे. देशातील प्रत्येक कुटुंबातील 70 पेक्षा जास्त वयातील व्यक्तींसाठी मोफत उपचार आणि देशातील 3 कोटी बहिणींना लखपती बनवणार ही मोदींची गॅरंटी असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच अशी गॅरंटी देण्यासाठी हिम्मत लागते आणि ही हिम्मत आमच्यात आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले.

तर गेल्या 10 वर्षातील कामगिरीबद्दल सांगताना मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने गेल्या 10 वर्षात देशाच्या विकासाठी अनेक कामे केली आहे. 2024  ची लोकसभा निवडणूक विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नला पूर्ण करण्याची निवडणूक आहे. 2014 पूर्वी देशातील गरिबांना असं वाटतं होते की, या देशात विकास कधीही होणार नाही मात्र आमच्या सरकारने गेल्या 10 वर्षात देशातील प्रत्येक घरात वीज दिली  तर 4 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना घरे दिली आहे.

काँग्रेसला माहिती आहे काँग्रेस पक्ष 2024  ची लोकसभा निवडणूक जिंकणार नाही यामुळे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी भाजप आणि एनडीए सरकारवर आरोप करत आहे. मात्र काँग्रेस आणि इंडिया आघाडी नेहमी विकास आणि शेतकरी विरोधी आहे. काँग्रेसने विदर्भाचा विकास केला नाही मात्र ही निवडणूक जिंकण्यानंतर आम्ही विदर्भाचा विकास करणार असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेमंत गोडसेंचा लोकसभेचा मार्ग मोकळा, छगन भुजबळांची माघार !

काँग्रेस आघाडीच्या कामकाजासाठी मराठीत एक म्हण आहे, बारशाला गेला आणि बाराव्याला आला… असे म्हणत मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.

follow us