Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी (Lok Sabha Election) सुरू केली आहे. या नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात तिन्ही पक्षांचं ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही असे नेतेमंडळी नेहमीच सांगत असतात. अशातच आता लोकसभा निवडणुका जवळ आल्याने जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दबावाचं राजकारणही पहायला मिळत आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठा दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सुपक वॉरियर्स म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख योद्धे आहेत. सुपर वॉरिअर्सने दिवसातील तीन तास पक्षाला दिले तर लोकसभा निवडणुकीत 340 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असा दावा बावनकुळे यांनी केला.
Madha Lok Sabha : माढा मतदारसंघात मोहिते-पाटलांचा डाव; रणजीत नाईक-निंबाळकरांची झोप उडणार!
बावनकुळे यांनी भाजपाच्या मालेगाव बाह्य मध्य आणि बागलाण मतदारसंघातील प्रतिनिधी आणि सुपर वॉरियर्सची संवाद सभा घेतली. या सभेत त्यांन लोकसभा निवडणुकीतील रणनितीबाबत चर्चा केली. तसेच मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे याचीही माहिती घेतली. यावेळी पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉ. सुभाष भामरे, रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष निलेश कचवे आदी उपस्थित होते.
राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार
बावनकुळे पुढे म्हणाले, राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार 45 मतदारसंघात विजयी होतील. तसेच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा विजय होऊन राज्यात पुन्हा सत्ता येईल. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. यासाठी केंद्र सरकारने मागील नऊ वर्षात जी कामे केली आहेत ती लोकांपर्यंत घेऊन जा, अशा सूचना बावनकुळे यांनी या सभेत दिल्या.
Devendra Fadnavis : अपात्र झाले तरीही शिंदेच CM ! फडणवीसांनी कारणही सांगितलं
भाजपा 26 तर शिंदे-अजित पवार गटाला 22 जागा : फडणवीस
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा 26, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 22 जागा लढविणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिली. 2019 मधील निवडणुकीत भाजपाने 25 जागांवर तर शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढली होती. यामध्ये भाजपला 23 आणि शिवसेनेच्या 18 उमेदवारांचा विजय झाला होता. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा सर्व्हे करण्यात आला आहे. विजयी होतील अशा उमेदवारांची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसं पाहिलं तर 2019 मध्ये निवडून आलेल्या खासदारांनाच पुन्हा तिकीट दिलं जाईल अशी परंपरा आहे पण, हा अंतिम शब्द नाही असे स्पष्ट करत फडणवीसांनी विद्यमान खासदारांची धाकधूक वाढवली आहे.