Download App

मुंडे बहिण-भाऊ गोपीनाथ गडावर एकत्र, पंकजांच्या उमदेवारीवर धनंजय मुंडे काय म्हणाले?

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : सध्या लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. भाजपने (BJP) बीडमधून खासदार प्रीतम मुंडे याचं तिकीट कापून भाजप नेत्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) उमदेवारी दिली. पंकजा मुंडेंना उमदेवारी जाहीर झाल्यानंतर आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तिन्ही मुंडे बहिण-भाऊ गोपीनाथ गडावर आले होते. पंकजा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे तिघेही प्रथमच गोपीनाथ गडावर आले. त्यामुळे बीडच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळाले.

‘लेकरांसाठी गुन्हे अंगावर घ्या पण..,’; जरांगेंकडून मराठा बांधवांना आवाहन 

दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, आम्ही तिघेही गोपीनाथ गडावर आलो, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. ताईला उमेदवारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या वेशीवरच ताईंचे स्वागत करणार होतो. पण, त्या म्हणाल्या की तू पालकमंत्री आहेस, तर तू घरी थांब, मी भेटायला घरी येते. मात्र, मी घरातला मोठा आहे. मनाचं मोठेपण दाखवावं लागतं. त्यामुळं कुठलेली प्रोटोकॉल न पाहता गडावर आलोय. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळालीये, मग तिचं स्वागत करायला मी इथं असणं हे माझं काम आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

‘गरळ ओकून CM शिंदेंनीही लाट अंगावर घेतली’; ‘करेक्ट कार्यक्रम’ वरुन मनोज जरांगेंनी वचपा काढलाच 

तर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी लोकसभेची उमेदवार आहे. म्हणूनच मी आज गोपीनाथ गडावर आले आहे. मी ठरवलं होतं की, माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी. आमच्या काकींचे आणि अण्णांचे आशिर्वाद घ्यावेत. मात्र धनंजय यांनी सांगितलं की, तेच गोपीनाथ गडावर येत आहेत, असं पंकजा म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, मी येथे माझ्या भावाला भेटले पण मी घरी जाऊन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटणार आहे. मी त्यांच्याशी चर्चा करेन. आज माझं लोकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे. आज माझ्या स्वागताला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रतिमा मुंडे आलेत. विचार करा, मी किती तगडा उमेदवार आहे, पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे बोलले जात आहे. आता बीडमधून महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा जोरात सुरू आहे. बीड लोकसभा महाविकास आघाडीकडून शरद पवार गडाकडे आहे. त्यामुळं त्यामुळे शरद पवार बीडमधून कुणाला उमेदवारी देतात, याची उत्सुकता वाढली आहे.

follow us