Download App

जानकरांचा भाजपला दणका! जागांची मागणी करत ‘इंडिया’त जाण्याचे दिले संकेत

Mahadev Jankar : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे आता भाजपबरोबर (BJP) खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत राज्यातून जनस्वराज्य यात्रा काढली. त्यानंतर आता आणखी एक पाऊल पुढे विरोधकांच्या इंडिया आघाडीशी (India Alliance) चर्चाही सुरू केली आहे. इंडिया आघाडीत सामील होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

राजधानी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इंडिया आघाडीबरोबर जागांसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. इंडिया आघाडीत सहभागी झालात तर किती जागांची मागणी कराल ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर जानकर म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांची मागणी इंडिया आघाडीकडे केली आहे. किमान तीन तरी जागा मिळाव्यात. देशातील प्रत्येक राज्यांत काही जागांची मागणी इंडियाकडे करणार आहोत.

Mahadev Jankar : जानकरांना ‘चूक’ उमगली, भाजपला बाजूला ठेवत आखला नवा प्लॅन!

राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरही जानकर यांनी भाष्य केले. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे असेल तर संसदेतून कोटा वाढविण्याची गरज आहे. या माध्यमातून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे नियम घातले पाहिजेत. त्यासाठी राज्य सरकारने एखादा आयोग नेमून अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे. असे जानकर म्हणाले.

भाजपबरोबर गेलो हीच मोठी चूक

जानकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगलीतील विटा येथे भाजप आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. भाजप (BJP) ज्यावेळी सत्तेत येत नव्हता त्यांना दीड ते दोन टक्के मतांची गरज होती. त्यावेळी त्यांनी आमच्याशी युती केली. सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सारखेच आहेत. त्यामुळे आता भाजपपासून अंतर राखत पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यावेळी जानकर म्हणाले होते.

मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव धुडकावला, आंदोलनाचा निर्णय उद्या होणार

Tags

follow us