Download App

जंगलात एकच वाघ असतो; महाडिकांचा बंटी पाटलांना इशारा

Mahadevrao Mahadik On Banti Patil :  कोल्हापूर जिल्ह्यात आता पुन्हा एकदा महाडिक विरुद्ध पाटील हा संघर्ष सुरु झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहीर झाली आहे. या निमित्ताने महाडिक व पाटील हे पुन्हा आमनेसामने आले आहेत. निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका करण्यात येते आहे. महाडिक गटाचे महादेवराव महाडिक यांनी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर घणाघात केला आहे.

बंटी पाटीलला आमदार केलं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. विद्यापीठ निवडणुकीत माझा पुतण्या मुन्नाला डावलून बंटी याला संधी दिली, कारण मी शब्द दिला होता, असे म्हणत महादेवराव महाडिकांनी सतेज पाटलांना सुनावले आहे. तसेच जंगलात एकच वाघ असतो हे अजून त्यांना कुणाला माहिती नाही. ज्यावेळी वाघाची डरकाळी ऐकू येते तेव्हा समजतं की या जंगलामध्ये वाघ आहे, धोका आहे, असे म्हणत त्यांनी सतेज पाटलांना इशारा दिला आहे.

सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका

याआधी खासदार धनंजय माहडिक यांनी बोलताना बंटी पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सतेज पाटील हे सगळीकडे सांगतायत मी 96 कुळी पाटील आहे. सर्वजण 96 कुळी पाटील आहेत. पण, ते मनोरुग्ण पाटील आहेत. अशा शब्दात महाडिक यांनी थेट सतेज पाटील यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

बंटी पाटील कोल्हापुरला लागलेला शाप आहे. 15 वर्षे आमदार, 8 ते 9 वर्षे मंत्री होते. त्यांनी कोल्हापुरचा काय विकास केला? सतेज पाटील कोल्हापुरला लागलेला शाप नाहीतर शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळही आहेत, असेही धनंजय महाडिक म्हणाले आहेत.

Tags

follow us