कर्जत MIDC वादात नवा ट्विस्ट! रोहित पवारांनी टाळलं राजकीय क्रेडिट; शिंदेंनाही सुनावलं

Rohit Pawar on Karjat MIDC : कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या कर्जत येथील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे आमनेसामने आले आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावर वाद तर सुरुच आहेत. पण, ही लढाई रस्त्यावरही आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जतमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर आज […]

Ram Shinde Rohit Pawar

Ram Shinde Rohit Pawar

Rohit Pawar on Karjat MIDC : कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या कर्जत येथील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे आमनेसामने आले आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावर वाद तर सुरुच आहेत. पण, ही लढाई रस्त्यावरही आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जतमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर आज पुन्हा रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांना घेरले आहे.

सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…

आमदार पवार यांनी आज विधीमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कर्जत एमआयडीसीसाठी मी सुद्धा पाठपुरावा केला होता असे राम शिंदे म्हणाल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर पवार म्हणाले, आज सत्तेत आलात आणि तु्म्ही जर क्रेडिट घेणार असाल तर जरूर घ्या. ज्या एमआयडीसीचा पाठपुरावा त्यांनी नाही तर मी केला. त्याचं क्रेडिट त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी जीआर हातात घ्या, फोटो काढा, बातम्या छापा पण ते तरी करा. त्यांनी पाठपुरावा केला असेल तर पुढे या आपण मीडियासमोर चर्चा करू असे मी म्हणालो होतो पण ते काही पुढे आले नाहीत. त्यांना क्रेडिट घ्यायचं असेल तर घ्या मला राजकीय क्रेडिट घ्यायचं नाही. मला फक्त सामान्य लोकांच्या मुलांना त्यांच्या हाताला काम मिळवून द्यायचं आहे. हे जर तुम्ही (राम शिंदे) क्रेडिट घेऊन होणार असेल तरी काही हरकत नाही.

उद्योगमंत्र्यांवर राजकीय दबाव

आज नियतीनेही एक योगायोग घडवून आणला तो म्हणजे मी आलो त्याचवेळेस उद्योगमंत्री उदय सामंत तिथे आले. त्यांनी सुद्धा या जॅकेटबद्दल विचारलं. मी त्यांना सांगितलं की एमआयडीसीचा प्रश्न महत्वाचा आहे. 25 हजार युवकांनी त्यांच्या पालकांनी सह्या करून निवेदन तुम्हाला दिलं आहे. तो आकडा 87 हजारांच्या आसपास गेला आहे. उद्या एक लाखांच्याही पुढे जाईल. निदान त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तरी तुम्ही निर्णय घ्यावा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटलं की त्यांनाही हा प्रश्न मार्गी लावायचा आहे पण राजकीय दबाव त्यांच्यावर आहे. राजकीय दबाव धुडकावून युवकांच्या बाजूने निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर ते आता सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा करू या, असे सांगितले.

Exit mobile version