Download App

Jayant Patil : जयंत पाटील स्वागतासाठी तयार; म्हणाले, निलेश लंके येत असतील तर…

Jayant Patil on Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आहे. भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांना उमेदवारी दिली आहे.  तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. आमदार निलेश लंके यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. निलेश लंके (Nilesh Lanke) कधीही शरद पवार गटात प्रवेश करू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता जयंत पाटील यांच्या (Jayant Patil) वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. निलेश लंके पक्षात आले तर त्यांचं स्वागतच आहे, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले.

Ahmednagar Loksabha : निलेश लंके खरंच ‘तुतारी’ फुंकणार का ? राजकारणात काहीही होऊ शकते पण..

भारतीय जनता पार्टीने काल दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये नगर दक्षिण मतदारसंघातून सुजय विखे यांना तिकीट मिळाले. यानंतर निलेश लंके यांनी हालचालींना वेग दिला. निलेश लंके आता लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तरी अजून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला नाही. तर दुसरीकडे निलेश लंके यांनी वेगळा निर्णय घेतला तर त्यांना आमदारकी सोडावी लागेल नाहीतर तो अपात्र होईल. तसेच कायद्यानुसार अशा प्रकारे पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यास पक्ष कारवाई करू शकतो. असा इशारा यावेळी अजित पवार यांनी दिला आहे.

या घडामोडींवर जयंत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. निलेश लंके लोकांमधील नेते आहेत. ते पक्षात आले तर त्यांचं स्वागतच आहे. ज्या आमदारांनी सह्या केल्या त्यांना माहिती नाही कशावर सही केली. त्यापैकी निलेश लंके एक आहेत. आमची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय अजून झालेला नाही. निलेश लंके एक चांगला चेहरा आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार का, नगर दक्षिण मतदारसंघात निलेश लंके महाविकास आघाडीचे उमेदवार राहणार का, या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.

निलेश लंके शरद पवार गटात जाणार? अजितदादांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर 

follow us

वेब स्टोरीज