निलेश लंके शरद पवार गटात जाणार? अजितदादांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर
Ajit Pawar on MLA Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अद्याप फायनल नाही. मात्र, आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात जाणार आणि तिकीटही घेणार अशा चर्चा जोरात आहेत. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं खुद्द शरद पवार आणि त्यानंतर निलेश लंके यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत मोठा खुलासा माध्यमांशी बोलताना केला. अजित पवार म्हणाले, निलेश लंकेंबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. आम्ही कुणी अजून काही चर्चा केलेली नाही. शरद पवार गटात जाणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. पण, त्यात आजिबात तथ्य नाही.
Nilesh Lanke : महानाट्याच्या माध्यमातून लोकसभेची पेरणी? लंकेंनी स्पष्ट बोलून दाखवलं
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्याच वाट्याला जाणार हे निश्चित आहे. महायुतीत अजित पवारांचा पक्ष आहे. तरी देखील येथे भाजपाच्याच चिन्हाचा उमेदवार असेल हे सुद्धा स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत महायुतीतील अन्य पक्षांना संधी नाही. मात्र अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचे नाव सातत्याने पुढे येत आहे. यात तथ्यही आहे. कारण मागील काही दिवसांतील घडामोडी पाहिल्या तर हे स्पष्ट दिसत आहे.
निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने नगर शहरात महानाट्य आयोजित करण्यात आले होते. यावेळी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निलेश लंकेंनी आता तुतारी वाजवावी अशी ऑफरच दिली होती. त्यानंतर काल तर निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या. तशा बातम्याही आल्या होत्या. परंतु, दोन्ही नेत्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.
निलेश लंके अजितदादांची साथ सोडणार.. शरद पवार म्हणतात, ‘खरं की काय? मला तर माहितीच नाही‘
लंकेंच्या प्रवेशाबाबत मला माहिती नाही : शरद पवार
निलेश लंके परत आमच्यासोबत येणार, या चर्चांना काही अर्थ नाही. या चर्चा मला तुमच्याकडूनच ऐकायला मिळत आहेत. किती जण संपर्कात आहेत याबद्दल माहिती नाही. कारण आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक असे आहेत की, ज्यांना जे चालले आहे ते योग्य वाटत नाही. त्यांनी आमच्यापासून दूर जाण्याचे निर्णय घेतला आहे, सध्या तरी ते त्यांच्या निर्णयावरुन ते ठाम आहेत. पण अस्वस्थ आहेत. आमच्यासोबत कोण येणार आहे त्याची माहिती द्या, माझ्या समोर उभे करा, अशीही गुगली शरद पवार यांनी टाकली.