Download App

शेवगावातील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, धर्माच्या नावावर..

Sharad Pawar on Shevgaon Riots : अहमदनगर जिल्हा (Ahmednagar) हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. अनेक ऐतिहासक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. त्यानंतर आम्ही वाचले की याच जिल्ह्यात शेवगावला दोन तीन दिवस बाजारपेठ बंद. जातीजातीत अंतर वाढतंय. संघर्ष होतोय. हे काम काही शक्ती करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणं, लढा देणं हे काम तुमच्या माझ्यासमोर आहे. हे जर केलं नाही तर हमाल, कष्टकरी कामगारांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा आरोप केला.

Sharad Pawar : कर्नाटकातील भाजपच्या पराभवाचा दाखला देत शरद पवारांनी फुंकलं संघर्षाचं रणशिंग!

पवार यांनी कर्नाटकचं उदाहरण देत तेथेही त्या लोकांनी सत्तेचा वापर करून द्वेष पसरवल्याचा आरोप जनतेने त्यांना धडा शिकवल्याचं सांगितलं आणि भाजपावर हल्लाबोल केला. कर्नाटकात होऊ शकतं तर अन्य राज्यात का होणार नाही हेच आता पहायचं आहे, असे सांगितले.  शरद पवार आज हमाल माथाडी कामगारांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार प्रहार केले.

कर्नाटकात होऊ शकतं, अन्य राज्यात का नाही 

काल मी बंगळुरूला होतो. कर्नाटकात नवीन राज्य आलं. माणसांत विदि्वेष वाढवायचे काम तेथील आधीच्या सरकारने केले. अनेकांना वाटत होते की या निवडणुकीत सत्ताधारी जिंकणार. पण सामान्य माणसांच राज्य आता तेथे आलं आहे. कालच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास एक लाख लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे यामध्ये 70 टक्के तरुण विविध जाती धर्मांचे होते. हे घडलं कशामुळे त्याचं कारण कष्टकरी माणसांची एकजूट. जर कर्नाटकात अशी एकजूट होऊ शकते तर अन्य राज्यात कशी होत नाही हे पाहण्याचा काळ आता आला आहे, अशा सूचक शब्दांत त्यांनी आगामी काळातील संघर्षासाठी तयारीचे संकेत दिले.

विखे पाटील, आजोबांचा तरी आदर्श घ्या! पवारांसमोरच बाबा आढाव संतापले, फडणवीस, निलंगेकरही निशाण्यावर

Tags

follow us