‘नगरच्या नामांतराचे स्वागतच पण, महाराष्ट्र सदनातून’.. अजित पवारांनी राज्य सरकारला सुनावलं

Ajit Pawar on Ahmednagar name change : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. या निर्णयावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. पण, महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची […]

Ajit Pawar Eknath Shinde

Ajit Pawar will be a chief minister replace by Eknath Shinde said Prithviraj chavan

Ajit Pawar on Ahmednagar name change : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. या निर्णयावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. पण, महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तेथील पुतळे हटविण्याचे काहीच कारण नव्हते.

अदानी दुसऱ्यांदा पवारांना भेटले; अजितदादांनी कारण टाळलं पण लॉजिक सांगितलं

अहिल्यानगर, अहिल्यादेवी नगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर होणार अशी तिघांची वेगवेगळी स्टेटमेंट आहेत. याबाबत सरकारच्या निर्णयाचे परिपत्रक निघेल त्यानंतरच नेमकं काय नाव हे समजेल. नगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी अनेक वर्षांपासून होती. त्यानंतर नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी (31 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली.

पवार पुढे म्हणाले, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराबाबत न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. नगर जिल्ह्याच्या नामांतराची वेळ आताच का निवडली आहे. महापुरुषांची नावे महत्वाच्या ठिकाणी दिली पाहिजे. पण, त्यामागे राजकारण करण्याचे काम करू नये. निवडणुका, स्वार्थ डोळ्यांसमोर ठेऊन निर्णय घेतले जाऊ नयेत, अशी माझी अपेक्षा आहे, असे पवार यांनी सांगितले.

“शरद पवारांना खात्री पटली म्हणूनच ते…” : मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर उदय सामंत यांनी सांगितलं कारण

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केली. अहमदनगरचं अहिल्यादेवीनगर नामांतराच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण जो बुंद से जाती है हौद से नही आता है, असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारच्या मनात अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल काय भावना आहेत या दिल्लीतील कार्यक्रमाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा जरी पुढे केला असला तरी लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Exit mobile version