Download App

अजितदांदांचे चंद्रकांतदादांना खोचक टोले, म्हणाले, दादा राजकारणात आल्यापासून..

Ajit Pawar on Chandrakant Patil : काँग्रेस नेते आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हेंबाबत वक्तव्य केल्याने या  चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री पाटील यांना सुनावले.

पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याचे विचारले असता पवार म्हणाले, ‘मला याबाबत काहीही माहिती नाही.’ खासदार अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत पवार म्हणाले, ‘अशा चर्चा तुम्ही नेहमीच ऐकत असता. पण एक सांगतो चंद्रकांत दादा राजकारणात आल्यापासून कोण कोण कुठं कुठं जाणार याची जर लिस्ट काढली तर तुम्हालाच संख्या समजणार नाही. कोण काय वक्तव्य करतंय त्या वक्तव्यावरून तरी त्याला किती महत्व द्यायचे हे तुम्ही ठरवा.’

Eknath Shinde मी सर्वांना कामाला लावले : …म्हणूनच घरात बसणारे आता रस्त्यावर उतरलेत!

राजकारण्यांकडून केली जाणारी चुकीची वक्तव्ये थांबली पाहिजेत असे पाटील म्हणाले होते. त्यावर पवार म्हणाले, ‘अशी वक्तव्ये थांबलीच पाहिजेत. त्यासाठी चंद्रकांत दादांनी आधी स्वतःपासून सुरुवात करावी. मला सुद्धा हे पटत नाही. एकाने आ रे म्हटले की दुसऱ्याने लगेच का रे म्हणायचे हे बरोबर नाही. आज बेरोजगारी, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. मात्र त्यांची कुठेच चर्चा होत नाही. लोकांना अशा वक्तव्याचे काहीच देणेघेणे नसते. त्यामुळे राजकारण्यांनी बोलताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत आणि आपल्याबद्दल लोकांचे मत चुकीचे बनणार नाही याची काळजी घ्यावी.’

‘कोरोनाचे रुग्ण वाढत चालले त्यावेळी आम्ही अधिवेशनात विनंती केली. कोरोना आटोक्यात आणण्यसाठी काय कार्यवाही करणार हे सांगा असे आम्ही सरकारला सांगितले होते. आमच्या सरकारच्या काळात आम्ही केंद्राच्या संपर्कात होतो. आता मात्र या सरकारमध्ये गांभीर्य कुणालाच नाही. गांभीर्य असेल तर सरकारने सांगितले पाहिजे. मास्क वापरला पाहिजे. पण तसे आदेशच काढलेले नाहीत. मंत्री मास्क वापरत नाहीत त्यामुळे जनतेलाही गांभीर्य नाही.’

पालकमंत्री विखे अॅक्शन मोडमध्ये; नगरमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’

‘सरकारला विनंती आहे की कोरोना गांभीर्याने घ्या. लोकांना दिलासा द्या. पत्रकार परिषद घेऊन आजाराची काय परिस्थिती आहे याची माहिती द्या. मुख्यमंत्री आता अयोध्या दौऱ्याला निघाले असतील तर उपमुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी. ते ही  नसतील तर आरोग्यमंत्र्यांनी तरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी’ असे पवार म्हणाले.

Tags

follow us