Maharashtra Assembly Election 2024 : गेले महिनाभर मोठ्या उत्साहात प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज बुधवार (दि. 20 नोव्हेंबर)रोजी होत असून, त्यात 4,136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. 9 कोटी 70 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आव्हानही निवडणूक आयोगासमोर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे. या सर्व घडामोडींवर लेट्सअप मराठीची नजर असून आपल्याला या पेजवर सर्व अपडेट्स मिळणार आहेत. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात काय घडत आहे किंवा कुठ किती मतदान होतय या सर्व घडामोडींसाठी कायम लेट्सअप मराठीशी जोडलेले राहा.