Maharashtra BJP : चंद्रशेखर बावनकुळे टीम बदलणार? भाजप कार्यकारणीत फेरबदल

Maharashtra BJP : आगामी काळातील लोकसभा निवडणूका आणि भाजपचं मिशन ४०+ साठी प्रदेश भाजपने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकारणीमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी नवीन कार्यकारणी जाहीर केली नव्हती. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांच्याकडून त्यांची नवीन टीम जाहीर केली जाणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यात लोकसभा […]

Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis

Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis

Maharashtra BJP : आगामी काळातील लोकसभा निवडणूका आणि भाजपचं मिशन ४०+ साठी प्रदेश भाजपने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकारणीमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी नवीन कार्यकारणी जाहीर केली नव्हती. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांच्याकडून त्यांची नवीन टीम जाहीर केली जाणार आहे.

पुढील वर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणूक होणार आहेत. देशात पुन्हा एकदा बहुमतामध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून मोठी तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. कारण राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यामुळे भाजपने राज्यात लोकसभेसाठी मिशन ४० ठेवले आहे, त्यामुळे आता यासाठी भाजपकडून नवीन कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे.

Mohit Kamboj : राऊतांच्या ‘त्या’ आरोपांनंतर आज कंबोज पत्रकार परिषद घेणार

चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रदेश कार्यकारणी बदलली जाण्याच्या चर्चा होत्या पण त्यावेळी कार्यकारणी बदलली गेली नाही. पण येत्या आठवड्यात हि नवी कार्यकारणी जाहीर केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूका तोंडावर असल्यामुळे त्याच अनुषन्गाने काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय काही जुन्या नेत्यांना देखील डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की कोणाला संधी मिळणार ? आणि कोणाला डच्चू मिळणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.

घोटाळा करुन सत्तेत आलेले बोलताना घोटाळा करतात; अजित दादांचा एकनाथ शिंदेंना टोला

Exit mobile version