घोटाळा करुन सत्तेत आलेले बोलताना घोटाळा करतात; अजित दादांचा एकनाथ शिंदेंना टोला
Ajit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषण करताना भंबेरी उडते, ते राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंना पंतप्रधान म्हणतात, कधी लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणतात, एकनाथ शिंदेंना द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चुकांची लिस्टच वाचून दाखवली आहे.
Uddhav Thackeray ; बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मिर नाहीय, मी 6 तारखेला जाणार
अजित दादा म्हणाले की, तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, चुकत असेल किंवा माहिती नसेल तर नोट काढून ती वाचा, त्यावर काहीही बिघडत नाही, असा टोला दादांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. आज ते मुंबईमधील बीकेसी मैदानात आयोजित वज्रमूठ सभेत बोलत होते.
अजित दादा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं या शिंदे-फडणवीस सरकारला नपूंसक म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील इतर कोणत्या राज्यसरकारला नपुंसक म्हटलं आहे? याचीही यांना जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही.
मुंबईबद्दल अजित पवार म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी ही काही सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी अनेकांनी आपला जीव दिला आहे. मुंबईचा मान सन्मान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. शिवसेनेमुळं मुंबई टिकली.
मुंबईत मराठी माणसाचा अभिमान मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला. मराठी माणूस एकजूट करुन राहिला हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. आणि हेच नेमकं काहींच्या डोळ्यावर यायला लागलं. काही लोकांना फोडण्याचं राजकारण झालं.