Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) राज्यातील अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal : कांदा खरेदीवरून भुजबळांचा सरकारवर निशाणा, नाफेडची आकडेवारी चुकीची
भुजबळ म्हणाले, खरंतर आज या सरकारने सभागृहात काहीतरी ठोस सांगायला हवे होते. अवकाळी पावसाने झालेले नुकसान पाहता तातडीने अनुदान जाहीर करण्याची गरज होती. गुजरात सरकारने त्यांच्या राज्यात या पद्धतीने अनुदान दिले होते. मग, या सरकारला काय अडचण आहे ? हे सरकार मस्तीत दंग आहे अजूनही त्यांना का शेतकऱ्यांचे हाल दिसत नाहीत याचं मला फार वाईट वाटतं. यासाठीच आम्ही स्थगन प्रस्ताव आणला होता, असे भुजबळ यांनी सांगितले.
Ajit Pawar : सरकारची धुळवड झाली असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी
ते पुढे म्हणाले, की नाफेडच्या खरेदी कंपन्या बाहेर थातुरमातुर खरेदी करतात. त्यांनी बाजार समितीत उतरले पाहिजे. बोली लावली पाहिजे इतकेच नाही तर तत्काळ अनुदान दिले पाहिजे.
अजित पवार म्हणाले, की सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तातडीची मदत जाहीर केली पाहिजे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही तसा निर्णय घेतला होता. आधी तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना दहा हजार रुपये दिले होते. त्यानंतर नुकसानीची आकडेवारी आल्यानंतर भरीव मदत केली होती. हे सरकार मात्र असे काहीच निर्णय घेत नाही हे बरोबर नाही. आम्ही सगळे विरोधी पक्ष कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत त्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असे पवार म्हणाले.