Download App

मंत्रिमंडळ विस्तार ! एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला

  • Written By: Last Updated:

Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या सरकारची वर्षेपूर्ती होत आली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय झालेला नाही. शिंदे गट व भाजपमधील आमदारांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लागले आहेत. अनेकांनी मंत्रिपदाची इच्छाही व्यक्त केलेली आहे. अनेकदा मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या तारखाही समोर आलेल्या आहेत. परंतु मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारी करत आहेत. आता पुन्हा एका शिंदे व फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत. (maharashtra cabinet expansion devendra fadanvis ekanath shinde delhi tour)

फडणवीस हे मुंबईतच होते. तर शिंदे हे तातडीने पंढरपूर येथून मुंबई येथे दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावरून शिंदे-फडणवीस एकत्रपणे दिल्लीला रवाना झालेले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांची दोघेही भेट घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठीसोबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्धसत्य तोंडावर आले, गुगली टाकून पूर्णसत्य बाहेर आणणार ! फडणवीसांचे शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

राज्यातील महामंडळाचा तिढा सोडविण्यात दोन्ही पक्षाला यश येत आहे. त्यात काहींचा मंत्रिमंडळात सहभाग होणार आहे. तर काहींना महामंडळाचे अध्यक्षपद देत मंत्रिपदाचा दर्जा असा फॉर्म्युला नक्की होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे
वर्षपूर्तीच्यानिमिताने शिवसेना-भाजपमधील अनेक इच्छुकांना गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे.

राजकारणातील आदर्श कोण? गडकरींनी घेतलं ‘या’ कम्युनिष्ट नेत्याचे नाव

तसेच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत दोन्ही पक्षाचे समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. या समितीत भाजपचे 3 ते 5, शिवसेनेचे 3 ते 5 नेते असणार आहेत. ही समिती दर आठवड्याला बैठक घेईल. दोन पक्षातील समन्वयासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असून, जुलैमध्ये दोन्ही पक्षांकडून मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) व भाजपकडून आता जोरदार तयार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us