Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
आज झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभागासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार आता राज्यात विना परवानगी झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचे दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी हा दंड 1 हजार रुपयांचा होता.
पुढील आठवड्यात स्वातंत्र्य दिवस असल्याने हर घर तिरंगा मोहिम राज्य सरकारकडून राबवण्यात येणार आहे. याच बरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात होणार आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
जलसंपदा विभागासाठी निर्णय : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार.
गृहनिर्माण विभागासाठी निर्णय : आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार, धोरणास मान्यता
नगरविकास विभागासाठी निर्णय : लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार, कर्ज उभारण्यास मान्यता
आदिवासी विकास विभागासाठी निर्णय : आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ
आदिवासी विकास विभागासाठी निर्णय : अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्य अडचणी दूर होणार, अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले विविध महत्त्वाचे निर्णय.#मंत्रिमंडळनिर्णय@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/i0tfVhuDh5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 7, 2024
वन विभागासाठी निर्णय : विना परवानगी झाड तोडल्यास आता 50 हजार दंड
उद्योग विभागासाठी निर्णय : महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार
वैद्यकीय शिक्षण विभागासाठी निर्णय : कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय, आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय
विधी व न्याय विभागासाठी निर्णय : न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा
महसूल विभागासाठी निर्णय : सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट
सहकार विभागासाठी निर्णय : जुन्नरच्या श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय
नेपाळमध्ये मोठा अपघात, एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर कोसळले, चार जणांचा मृत्यू
सांस्कृतिक विभागासाठी निर्णय : 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन