Chhagan Bhujbal : नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना ‘शिवाजी’ आणि ‘संभाजी’ ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार घेतला होता. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्यानंतर आता खुद्द भुजबळ यांनीच त्यांच्या वक्तव्यावर नव्याने स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकारमध्ये आहे म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही. माझी जी भूमिका आहे त्यावर मी ठाम आहे. बदलणार नाही. कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. सरकारमध्ये आहे म्हणून मी माझी भूमिका बदलेले असे नाही. ते पुढे म्हणाले, कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. ब्राह्मण आहेत म्हणून विरोध नाही. आधीच्या काळात ब्राह्मणांच्या मुलींनाह शिक्षण मिळत नव्हतं. त्यांना महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रबाई फुले यांनी शिक्षण दिले. जे काही ऐतिहासिक पुरावे आहेत त्यावर नक्कीच चर्चा करता येईल.
‘भुजबळांचे विधान मूर्खपणाचं, त्यांनी स्वत:चं नाव शिवाजी ठेवाव’; हिंदू महासंघ आक्रमक
संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही हे आधी त्यांनी स्पष्ट करावे. त्यांना संभाजी भिडे हे नाव का घ्यावं लागलं, त्यामागचं कारण काय याचं स्पष्टीकरण द्यावं. हे नाव घ्यायचं आणि बहुजन समाजात जायचं ते काही बरोबर नाही. ते बाहेर काय बोलत असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला आम्ही विरोध करणारच असेही भुजबळ म्हणाले.