‘भुजबळांचे विधान मूर्खपणाचं, त्यांनी स्वत:चं नाव शिवाजी ठेवाव’; हिंदू महासंघ आक्रमक

‘भुजबळांचे विधान मूर्खपणाचं, त्यांनी स्वत:चं नाव शिवाजी ठेवाव’; हिंदू महासंघ आक्रमक

Anand Dave onChhagan Bhujbal : आज नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना शिवाजी आणि संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार घेतला. आता हिंदू महासंघाने त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला करून भुजबळांवर जोरदार टीका केली.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दवे म्हणाले, आज पुन्हा एकदा छगन भुजबळांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मुळात हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीला बदनाम करण्याचे भुजबळांचं धोरण का असतं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. त्यांच्या घरात शिवाजी आणि संभाजी नावाचे किती लोक आहेत? असा सवाल दवे यांनी केला. ते म्हणाले, इतरांवर बोलण्याआधी छगन भुजबळ यांनी आधी स्वत:च्या घरातील नावं बदलावी. माझं तर म्हणणं आहे की, तुम्ही स्वत:चं नाव बदला आणि शिवाजी भुजबळ करून दाखवा, त्यानंतर आमच्याशी बोला.

लडाखमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने 9 जवान शहीद 

दवे पुढे बोलतांना म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलांची नावं शिवाजी किंवा संभाजी का ठेवली नाही? तुम्ही ओबीसी समाजाचे राजकारण करताना मराठा समाजाला नावं का घेता? भुजबळांचे हे विधान मूर्खपणाचे आहे, असे आम्ही मानतो. अनेक जातींमध्ये शिवाजी आणि संभाजी नाव असलेली वेगवेगळी माणसं आम्ही दाखवू शकतो. परंतु येथे व्यक्तीश: उल्लेख करणे योग्य नाही, असं दवे म्हणाले.

भुजबळ काय म्हणाले?
संभाजी भिडेंवर टीका करताना भुजबळ म्हणाले, संभाजी भिडे यांचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी नाव बदलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. खरंतर ब्राह्मण समाजानं वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. पण, कोणत्याही ब्राह्मणाच्या घरात शिवाजी, संभाजी ही मुलांची नावं ठेवली जात नाही.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील आणि नंतर रावसाहेब थोरात यांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. पण कुणाला सरस्वती आवडते, तर कुणाला शारदा. पण आम्ही काही यांना पाहिलं नाही. त्यांनी आम्हाला कोणतेही शिक्षण दिले नाही. पण आम्हाला ज्यांनी शिक्षण दिलं ते शाहू-फुले-सावित्रीबाई-कर्मवीर हेच माझे दैवत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube