Sangali Loksabha Exit Poll Update : लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चा झालेल्या जागांपैकी सांगलीचा मतदारसंघदेखील आघाडीवर होता. या ठिकाणी मविआकडून ठाकरे गटाने चंद्राहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या उमेदवारीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरदार शीतयुद्धाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली. त्यानंतर आता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सांगतील नो मशाल ओन्ली विशाल फॅक्टर चालल्याचे चित्र समोर आले आहे. (Sangali Exit Poll Update)
Exit Poll : मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान, दक्षिण भारतातही खातं उघडणार; ‘इंडिया’चीही टफ फाइट
काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?
4 जूनच्या अंतिम निकालापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार सांगलीत अपक्ष आमदार विशाल पाटीलच बाजी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील आणि महायुतीच्या संजयकाका पाटलांना पराभवाचा सामना करावा लागण्याची चिन्ह असल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. Tv9 पोलस्ट्राट, पीपल इनसाईट्स, एबीपी सी व्होटर यांच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये एबीपी सी व्होटर यांच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांना फिफ्टी-फिफ्टी जागा मिळतील. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एबीपी सी व्होटर –
त्यामध्ये भाजपला 17 जागा मिळतील ज्या 2019 च्या तुलनेत जागा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर शिंदेंच्या शिवसेनेला 6 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता एबीपी सीव्होटर यांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर इकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला 9 जागा शरद पवार यांचे राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेसला 8 जागा मिळतील अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवला जात आहे.
Loksabha Exit Poll : बीडचा निकाल आला; पंकजा मुंडे पवारांच्या शिलेदारावर ठरतायत भारी
द स्ट्रेलेमा –
द स्ट्रेलेमा यांच्या पोलनुसार राज्यामध्ये महायुतीला 24 ते 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 20 ते 23, तसेच सांगलीमध्ये एक अपक्ष म्हणजे कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करून निवडणुक लढवणारे विशाल पाटील हे निवडून येऊ शकतात. तर वंचितला या पोलनुसार राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज तक अॅक्सिस माय इंडियानुसार महायुतीला 38 ते 42 जागा तर, महाविकास आघाडीला 6 ते 10 जागांवर विजय मिळेल असे सांगितले आहे. इंडिया टिव्हीच्या अंदाजानुसार महायुतीला 34 तर, महाविकास आघाडीला 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय टाईम्स नाऊ व्हिएमआरच्या पोलनुसार महायुतीला राज्यात 38 तर, महाविकास आघाडीला केवळ 10 जागा दाखवण्यात आला आहे.
उमेदवारी नाकारल्याने ‘काँग्रेस’ एकवटली…
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. आणीबाणीतही इथून काँग्रेसचाच खासदार निवडून आला होता. पण 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपने सर केलेला हा किल्ला पुन्हा मिळवायचाच हाच उद्देश काँग्रेसने डोळ्यासमोर ठेवला होता. त्यासाठी विशाल पाटील या एकमेव उमेदवाराचे नाव दिल्लीला पाठविण्यात आले होते. मात्र अचानकपणे उमेदवारी डावलल्याने संतापाची लाट उसळून आली.वसंतदादा घराण्याचा, काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाल्याने सांगलीतील मदन पाटील गट, विशाल पाटील, प्रतिक पाटील, विश्वजीत कदम गट एकत्र आल्याचं दिसून आलं. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आघाडी धर्म बाजूला ठेवून विशाल पाटील यांना साथ दिल्याचे दिसून आले. याशिवाय पृथ्वीराज पाटील यांनीही विशाल यांनाच साथ दिल्याचे बोलले जाते.
सहा राज्यात काँग्रेसचा भोपळा; ‘या’ एक्झिट पोलने वाढली इंडिया आघाडीची ‘धाकधूक’
तासगांवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तरुण नेते रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनीही संजयकाका नकोच या भूमिकेतून विशाल पाटील यांना मदत केल्याची चर्चा आहे. जत तालुक्यातील धनगर नेत्यांनीही विशाल पाटलांना पाठिंबा दिल्याने त्यांना धनगर मतांचा मोठा फायदा होणार आहे. यासोबतच संरपंचांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वांनीच विशाल पाटलांनाच पसंत दिली असल्याचं चित्र दिसून येत आहे.
चंद्रहार पाटील तुल्यबळात कमी :
सांगली मतदारसंघात काँग्रेसला आणि वसंतदादा पाटील घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे. दादा घराण्याविषयी नेहमीच आदर राहिला आहे. पण याच वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारली गेली. चंद्रहार पाटील यांना उमेदवार जाहीर केल्याने वसंतदादा गटाकडून संतापाची लाट उसळली. चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचे मैदान गाजवले असले तरीही ते राजकीय मैदानात फाईट देऊ शकणार नाहीत, असे अनेक नेत्यांचे म्हणणे होते.