‘राष्ट्रवादीने काय गद्दारी केली म्हणून तुम्ही फोडाफोडी केली?’ उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली असे म्हणणारे राष्ट्रवादीनं काय खुपसलं होतं म्हणून राष्ट्रवादी फोडली, असा […]

Uddhav Thaceray And Devendra Fadnavis

Uddhav Thaceray And Devendra Fadnavis

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली असे म्हणणारे राष्ट्रवादीनं काय खुपसलं होतं म्हणून राष्ट्रवादी फोडली, असा जळजळीत सवाल केला.

41 हजार कोटींचं नियोजन कसं? अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं

शिवसेनेनं खंजीर खुपसला मग राष्ट्रवादीनं काय खुपसलं होतं? शिवसेना फोडून ४० आमदार आल्यानंतर संख्याबळ असतानाही राष्ट्रवादी का फोडलीत? ते फोडण्याआधी चार ते पाच दिवस आधी पंतप्रधानांनीच आरोप केले होते. त्या आरोपांचं आता काय झालं? त्या घोटाळ्याच्या पैशांचं काय झालं? कशासाठी ही फोडाफोडी केलीत? म्हणूनच म्हटलं एवढा भ्रष्टाचारी राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा होता तर त्यांनी नेमकी तुमच्याशी काय गद्दारी केली होती की तुम्ही त्यांना फोडलंत?, असे भाजपला टोचणारे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.

यानंतर संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. राष्ट्रवादीशी केलेली युती ही आमची कुटवनीती आहे, अधर्म नाही असे सांगितल त्यावरही उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. ही कूटनीती आहे की आधीपासूनची मेतकूट निती आहे हे मला माहित नाही. पण, या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तालोलुपता, सत्ताभक्षक हाच शब्द मला योग्य वाटतो. जसा नरभक्षक असतो तसे हे सत्ताभक्षक.

पुरस्कार वापसीवर केंद्र सरकार लावणार लगाम, ‘हमीपत्र लिहून घेणार’

ज्यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. मग आरोप खरे की अजित पवार खरे? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

 

Exit mobile version