महाविकास आघाडीची वज्रमूठ पुन्हा आवळणार; जयंत पाटलांनी सांगितलं बैठकीत काय घडलं ?

Jayant Patil : कर्नाटक येथील काँग्रेस पक्षाच्या यशानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती […]

Jayant Patil

Jayant Patil

Jayant Patil : कर्नाटक येथील काँग्रेस पक्षाच्या यशानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत उपस्थित होते.

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  पाटील म्हणाले, उन्हाळा कमी झाल्यानंतर जून महिन्यात पावसाचा अंदाज घेऊन वज्रमूठ सभा पुन्हा सुरू करणार आहोत. तिन्हा पक्षाचे प्रमुख आणि आमच्या आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी जागांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

आगामी निवडणुकांसाठी तिन्ही पक्ष तसेच अन्य मित्र पक्षांचे प्रमुख एकत्र बसून जागावाटपाबाबत चर्चा सुरू करणार आहोत. महाविकास आघाडीचा पर्याय जनतेसमोर ठेवायचा यावर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचे एकमत झाले आहे. मला वाटते की कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातही पुढील काळात यश मिळवून महाविकास आघाडी एकसंधपणे काम करेल.

काही लोकांना निवडणुका आल्या की मुंबई आठवते…मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालांवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा इतका मोठा पराभव का झाला, काँग्रेसला मिळालेल्या विजयावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पुढे काय होणार याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे पाटील म्हणाले.

मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही; ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

Exit mobile version