Download App

निवडणूक आयोगाची तयारी सुरु, ‘या’ महिन्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी

Maharashtra Election 2025 : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

  • Written By: Last Updated:

Maharashtra Election 2025 : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections 2025) होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. मात्र निवडणुका कधी होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या द्दष्टिने आढावा बैठक पार पडली.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत निवडणूक आयोगाने (Election Commission) उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका एकाच टप्प्यात होणे शक्य नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात दोन ते तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याची सध्या माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे डिसेंबर महिन्यात राज्यातील सर्व महापालिकांची निवडणुका होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर वार्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणूका घेण्याची तयारी केली आहे.

सभागृहात 42 सेकंद नाही, तब्बल 22 मिनिटं रम्मी खेळले!कोकाटेंची चौकशी अहवालाने केली पोलखोल

तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून निवडणूका लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर महाविकास आघाडीमधील पक्ष देखील या निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

follow us