Download App

मतदारसंघात या, माझ्याविरुद्ध उभे राहा; देसाईंचे राऊतांना ओपन चॅलेंज!

Shambhuraj Desai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या मतदारसंघात येऊन केलेली टीका देसाई यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मंत्री देसाई यांनी आज राऊतांच्या टीकेवर सडतोड प्रत्युत्तर दिले. लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतः माझ्याविरोधात बोलावे, असे आव्हान देसाई यांनी दिले.

NCP : CM शिंंदेंचा राष्ट्रवादीला दणका; भिवंडीत 18 बंडखोर नगरसेवक अपात्र

खासदार संजय राऊत यांनी काल शंभूराज देसाई यांच्या पाटण (जि. सातारा) मतदारसंघात येऊन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली होती. जसा खोक्यांचा भूकंप झाला तसे पाटण हे भूकंपाचे केंद्र आहे. महाराष्ट्रात कुठेही भूकंप झाला तरी पाटणाला केंद्रबिंदू शोधतात . त्यामुळे जनतेला अशा धक्क्यांचे काहीच वाटत नाही. त्यातूनही हा तालुका उभा राहतो. हा कसला धक्का मुंबईला भाऊचा धक्का बरा, असा टोला राऊत यांनी देसाईंना लगावला होता.

या टीकेला उत्तर देताना देसाई म्हणाले, लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतः माझ्याविरोधात बोलावे. माझ्या मतदारसंघात येऊन राहावे आणि माझ्याविरोधात उभे राहून दाखवावे. ठरवा 2024 मध्ये का होतंय ते, असे आव्हान त्यांनी दिले.

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं नव्या वादाला तोंड; ठाकरे गटाची घणाघाती टीका

बीआरएसला थारा मिळणार नाही 

राज्यात भारत राष्ट्र समिती पक्ष मोठ्या वेगाने विस्तारत चालला आहे. आज पक्ष प्रमुख के. चंद्रशेखर राव पंढपुरात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भगिरथ भालके आज पक्षात प्रवेश करणार आहेत. या घडामोडींवर देसाई यांनी भाष्य केले. ते म्हणाले, बीआरएस पक्षाला राज्यात थारा मिळणार नाही. जनता महाराष्ट्राच्या विकासासोबत आहे. राज्यातील जनता सूज्ञ आहे. राज्याचा विकास कशात आहे. सामान्य माणसांचे हित कशात आहे, हे लोकांना चांगले समजते असे देसाई म्हणाले.

Tags

follow us