Download App

Monsoon Session : नंबर एक अन् नंबर दोनचा उपमुख्यमंत्री कोण? जयंत पाटलांची शिंदेंना गुगली!

Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.

‘तिकडे जाऊ नका, परत इकडेच या’ : वडेट्टीवारांचे अभिनंदन अन् अनेक टोमणे; अजितदादांनाही हसू आवरेना

पाटील म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांचं महत्व इतक आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी विरोधी पक्षनेत्यांसदर्भात होणाऱ्या भाषणाकडं लक्ष दिलं. त्यावर अजित पवार म्हणाले आमच्या दोघांचं लक्ष तुमच्याकडेच आहे पण तुमचंच लक्ष आमच्याकडे नाही त्याला मी काय करू ? असा खोचक सवाल करताच सभागृहात जोरदार हशा पिकला.

मुख्यमंत्री विचलित न होता लक्ष देऊन सगळ्यांची भाषण ऐकत आहेत. पण, दोन उपमुख्यमंत्री काही लक्ष द्यायला तयार नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर एक कोण आणि नंबर दोन कोण. मुख्यमंत्र्यांनीच हे सांगायला पाहिजे पण बाकीचेच सांगत आहेत तर मग कसे होणार असा कोंडीत टाकणारा प्रश्न पाटील यांनी केला.

“मलाही त्या खुर्चीवर बसायचं होतं, पण…” : अखेर जयंतरावांच्या पोटातील गोष्ट ओठांवर आलीच!

विजय वडेट्टीवार हे विदर्भातील झुंजार नेतृत्व आहे. विरोधी पक्षनेतेपदी झुंजार नेतृत्व असणे गरजेचे होते. आज राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या राजकीय संस्कृतीत मोठे बदल झाले आहेत. या आव्हानांचा सामना करत ते काम करतील आणि नक्कीच न्याय देतील असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Tags

follow us