‘तिकडे जाऊ नका, परत इकडेच या’ : वडेट्टीवारांचे अभिनंदन अन् अनेक टोमणे; अजितदादांनाही हसू आवरेना

‘तिकडे जाऊ नका, परत इकडेच या’ : वडेट्टीवारांचे अभिनंदन अन् अनेक टोमणे; अजितदादांनाही हसू आवरेना

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. दरम्यान, वडेट्टीवार विरोधी पक्ष नेत्यांच्या जागेवर जात असतानाच “आता तिकडे जाऊ नका, परत इकडेच या” असं म्हणत पाठीमागून महाविकास आघाडीचे नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा ऐकताच अजित पवार यांनाही हसू आवरता आलं नाही. (Vijay Vadettivar has been appointed as the Leader of Opposition in the Legislative Assembly)

महाराष्ट्र विधानसभेच्या मागील 9 वर्षात 4 विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी गटाचा हात धरला आहे. एकनाथ शिंदे हे 2014 विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर 2 महिन्यांच्या कालावधीसाठी विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. शिंदेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी 42 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसकडे आली. काँग्रेसकडून या पदावर राधाकृष्ण विखे-पाटील यांची वर्णी लागली. ते 4 वर्ष या पदावर होते. मात्र त्यानंतर त्यांनीही शिंदेंप्रमाणे जुन 2019 मध्ये सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

अजितदादांनी हाताला धरून खुर्चीत बसवलं, शिंदेंच्या कोट्यांनी सभागृह हसलं; वडेट्टीवारांचं सत्ताधाऱ्यांकडून हटके अभिनंदन

त्यानंतर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपला विरोधात बसावे लागेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेते देण्यात आले. पुढे अडीच वर्षांनंतर शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदेंनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले. फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. मात्र वर्षभराच्या कालावधीच पवारांनीही राजीनामा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता वडेट्टीवार यांनीही याच विरोधी पक्षनेत्यांच्या पावलावर पाऊल टाकू नये, सत्ताधारी गटासोबत जाऊन नये, असे म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

लालबागच्या राजाला माझा अखेरचा सलाम…; नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या क्लीपमध्ये नेमकं काय?

अजित पवार यांनी 30 जूनला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट सत्तेत प्रवेश केला. राष्ट्रवादीतील 35 हून अधिक आमदारांना सोबत घेत ते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यानंतर शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मात्र संख्याबळामुळे आता हे पद काँग्रेसकडे आले आहे. यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाकडून विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले आहे. आज वडेट्टीवार यांच्या नावाला नार्वेकर यांनी मंजुरी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube