Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. या सभांतून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर (Uddhav Thackeray) भाजप नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस आहेत. काल एका सभेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जहरी टीका केली होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नालायक आणि कोडगे आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला आहे. फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट लिहीत जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा उद्धव ठाकरेंना दिला आहे.
हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू.
पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही.हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 20, 2024
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले,त्यांचा आम्ही आदर करू शकत नाही. शिवसेनाप्रमुख शब्दांत पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत.
दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता? स्वतःचीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि विकास ही काही सलीम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसं उत्तर दिलं जाईल! अशा तिखट शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे..’ बावनकुळे इतकं का चिडले?
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आयोजित एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “आज फडणवीस यांनी मला भ्रमिष्ट म्हणाले ठीक आहे. मी भ्रमिष्ट आहे की नाही जनता ठरवणार मात्र आज तुमची परिस्थिती खूप वाईट आहे, तुम्ही जनाची नाही तर मनाची ठेवा तुम्हाला दोन्ही नाही आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही लाज लज्जा सोडलेले कोडगे माणूस आहात.