Download App

‘पोलीस अन् सरकारी यंत्रणा बाजूला करा, बघू तुझी मर्दानगी’; राणेंनी ठाकरेंना ललकारलं!

Nilesh Rane vs Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेमुळे ठाकरे गट आणि भाजपात जुंपली आहे. ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जळजळीत टीका केली आहे.

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंचे कुटुंबिय आज बाळासाहेबांच्या नावाने वचने देत फिरत होते. पण, हेच लोक बाळासाहेबांच्या आजारपणाच्या दिवसात त्यांना प्राण्यांची उपमा देऊन हाका मारायचे. हे मी रामेश्वराची शपथ घेऊन सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी तुला रक्ताच्या भावापेक्षा जास्त सांभाळले. तुझे लाड केले. आज मातोश्री 2 मध्ये राहतोस. सामान्य शिवसैनिक, नातेवाईकांना तिथे जाण्याची परवानगी नाही.

पवारांचं राजकारण फडणवीसांनी मोडलं; सदाभाऊ खोतांनी सांगितला ‘तो’ किस्सा!

बाळासाहेबांना औषधंही वेळेवर दिली नाहीत. खायला दिलं नाहीस. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर कलंक लावण्याचे काम सुरू आहे. महापौरांचा जो बंगला, बाळासाहेबांच्या नावाखाली बळकावला, त्याची परवानगी कुणी दिली, असा सवाल राणे यांनी केला.

तुला लोक चपलेने मारतील

2014 ते 2019 मध्ये तुझे लाड फडणवीसांनी पुरवले. तुला सांभाळलं. तुझ्या रक्ताचा भाऊ काय बोलतो, त्याची काय अवस्था केली. कधी आमचं तोंड उघडायला लावलस, तर महाराष्ट्रातील जनता तुला चपलेने मारेल, असा घणाघात राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

Ahmednagar News : …म्हणून मनसेकडून अहमदनगरमधून पाठवला जम्मूमध्ये तिरंगा ध्वज

सगळी शासकीय यंत्रणा बाजूला ठेवा. पोलीस बाजूला ठेवा, आम्ही कलानगरमध्ये येतो. तुझी मर्दानगी बघू कसा मातोश्रीच्या बाहेर निघतो, त्यामुळे उगाच आमच्या नेत्यांना नाव ठेवण्याचं बंद करा. तुझे कपडे टराटरा फाडण्याची आमची तयारी आहे, असा इशारा राणे यांनी ठाकरेंना दिला.

Tags

follow us