Rohit Pawar Criticized Sanjay Shirsat : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले आहेत. पक्षाची ही वाताहत शऱद पवार गटाच्या नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता राज्य सरकार आणि सत्ताधारी गटातील नेत्यांवर त्वेषाने हल्ले सुरू केले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
रोहित पवार यांनी आज सातारा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर ते कोल्हापूरकडे रवाना झाले. ते म्हणाले, संजय शिरसाट स्वतः प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्या पोटात कुठंतरी दुखतंय. त्यांना मंत्री व्हायचं आहे. ते स्वतः बोललेले आहेत. आम्ही कुठेही पदासाठी, मंत्रीपदासाठी लाचार झालेलो नाही. आम्ही नियत कुठे विकलेली नाही. तेव्हा तुम्ही कुठेही राजकीय पतंग उडवू नका, असा टोला त्यांनी शिरसाट यांना लगावला.
‘शेतकरी हिताच्या निर्णयाचे धाडस त्यावेळच्या मंत्र्यांनीही दाखवलं नाही’; विखे पाटलांनीही काढला इतिहास
पवार कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळाल्यानंतर अध्यक्ष व्हायचं असतं तर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो असतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री सुद्धा होऊ शकलो असतो. पण, मी झालो का, मला कुठे व्हायचं होतं. पदासाठी मी लढत असतो तर आज मी सत्तेच्या बाजूने दिसलो असतो, असा टोला त्यांनी शिरसाट यांना लगावला. आम्ही पदांबाबत कधीच भेदभाव करत नाही. मात्र मलाच पद नकोय त्यापेक्षा मला विचार जास्त महत्वाचा वाटतो.