Rohit Pawar : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या (Maratha Andolan) घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही सरकारवर हल्लाबोल केला.
Maratha Reservation : फडणवीसांची क्षमायाचना म्हणजे एकप्रकारची कबुलीच – शरद पवार
आ. पवार (Rohit Pawar) यांनी काल धुळ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेवर संताप व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजपला सत्ता जाण्याची प्रचंड धास्ती आहे. त्यामुळे ते अन्य पक्ष आणि नेत्यांचे कुटुंब फोडत आहेत. यात भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही डिवचले आहे. त्यामुळे इंडिया संघटनेतून 2024 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा पवार यांनी केला.
जालना येथे 8 सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला अडथळा नको म्हणून आंदोलकांना उठविण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनावेळी 50 पोलीस, तर लाठीहल्ल्यावेळी 500 पोलीस, असे कसे?, सुरुवातीला दगडफेक नाही तर लाठीहल्ला झाला. सरकार खोटं बोलत आहे. पोलीस अधीक्षकांना निलंबित करून काय साध्य होणार असा सवाल करत लाठीमाराचा निर्णय मंत्र्यांनी घेतला. तेव्हा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यावा, सरकारनेही माफी मागावी, अशी मागणी आ. पवार (Rohit Pawar) यांनी केली.
Maratha Reservation : ‘सत्ताधाऱ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल’; वडेट्टीवारांनी दिलं आव्हान
जर माफी मागून राज्य शांत राहत असेल तर चांगलच आहे. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची (Maratha Reservation) बदमाशी आहे. अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज कसा केला?, असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. आमच्याकडून जितके प्रयत्न करता येणे शक्य आहे तितके आम्ही नक्कीच करू. सरकारने आंदोलकांकडे आंदोलन म्हणून पहावे. पण, येथे येणाऱ्यांनी सेल्फीचं पडलं आहे. जरांगेंच्या आरोग्याचं काहीच पडलं नाही. वेळप्रसंगी मी देखील उपाशी राहण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.
महाराष्ट्रात मराठा हा कुणबी आहे आणि हीच काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे सरकारने (Maratha Reservation) आता अंत पाहू नये. नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. सरकारने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नये, असेही कडू यांनी सुनावले.