Download App

राष्ट्रवादीचं घड्याळ गेलं तर पुढं काय? आयोगाच्या नोटीसनंतर रोहित पवार स्पष्टच बोलले

Rohit Pawar on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार काही आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या राजकीय नाट्यानंत पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे खरी राष्ट्रवादी कुणाची, पक्षचिन्ह कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने बुधवारी शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. या सगळ्या घडामोडींवर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’

आयोगाने नोटीस दिल्यानंतर रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेत आहे, असं सामान्य लोकांचे मत झाले आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया पूर्ण करत असताना दोन्ही बाजूंचे गट ताकद लावतील आणि युक्तिवादही होईल.

या लढाईत निवडणूक आयोग कुणाच्या बाजूने निकाल देईल, याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. आम्ही याची न्यायालयीन लढाई लढूच. पण, पुढील काळात या लढाईत जर का चिन्ह राहिलं नाही, तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळालं पाहिजे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामारे जावे लागणार याचा अंदाज आला आहे, असे रोहित पवार म्हणाले. यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत. शरद पवार यांच्याबरोबर राहून त्यांच्या विचारांची सोबत घेऊन ही लढाई आमच्यासाठी महत्वाची आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

भाजपच्या डोक्यात वेगळाच प्लॅन ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री नक्की होतील असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही चलबिचल सुरू झाली आहे. पटेल यांच्या या वक्तव्यावर आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

मी अजितदादांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. परंतु, सामान्य नागरिक म्हणून मला ही गोष्ट पटणार नाही. जर अजितदादा महाविकास आघाडीत असते तर पुढील पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहिले असते. पण, सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात भांडणे लावून दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

 

Tags

follow us