Download App

चर्चा तर होणारच! ‘एमआयडीसी’चं जॅकेट का घातलं? रोहित पवारांच्या उत्तराने उद्योगमंत्र्यांनाच घेरलं

Rohit Pawar on MIDC Jacket : कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या कर्जत येथील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे आमनेसामने आले आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावर वाद तर सुरुच आहेत. पण, ही लढाई रस्त्यावरही आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जतमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर आणखी पुढे जात आज आ. पवार यांनी नव्या चर्चेला सुरुवात करून दिली. त्यांच्या एका कृतीने विधीमंडळात जोरदार चर्चा सुरू झाली. रोहित पवार आज एमआडीसी नाव असलेले जॅकेट परिधान करून विधीमंडळात आले होते. त्यांनी हे जॅकेट का घातले, हे जॅकेट त्यांना कुणी दिले अशी चर्चा येथे सुरू झाली. या चर्चांना खुद्द रोहित पवार यांनीच पूर्णविराम दिला.

वडेट्टीवारांनाच विरोधी पक्षनेता का केलं? बाळासाहेब थोरातांनी खरं काय सांगूनच टाकलं

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना या जॅकेटचा प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले, माझा एक मित्र आहे. तो काही माझ्या मतदारसंघातला नाही. पण, त्याचं म्हणणं आहे की मुद्द्याचं कुणीच बोलत नाही. सामान्य लोकांच्या अडचणी त्यांच्या प्रश्नांवर बोलण्याची आज खरी गरज आहे. एमआडीसीचा हा प्रश्न फक्त तुमच्या मतदारसंघाचाच नाही तर पूर्ण राज्याचा आहे. म्हणून त्याने मला हे जॅकेट दिलं. हेच जॅकेट घालून या असं सांगितलं. म्हणून आज मी हे जॅकेट घातलं.

उद्योगमंत्र्यांवर राजकीय दबाव

आज नियतीनेही एक योगायोग घडवून आणला तो म्हणजे मी आलो त्याचवेळेस उद्योगमंत्री उदय सामंत तिथे आले. त्यांनी सुद्धा या जॅकेटबद्दल विचारलं. मी त्यांना सांगितलं की एमआयडीसीचा प्रश्न महत्वाचा आहे. 25 हजार युवकांनी त्यांच्या पालकांनी सह्या करून निवेदन तुम्हाला दिलं आहे. तो आकडा 87 हजारांच्या आसपास गेला आहे. उद्या एक लाखांच्याही पुढे जाईल. निदान त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तरी तुम्ही निर्णय घ्यावा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटलं की त्यांनाही हा प्रश्न मार्गी लावायचा आहे पण राजकीय दबाव त्यांच्यावर आहे. राजकीय दबाव धुडकावून युवकांच्या बाजूने निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर ते आता सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा करू या, असे सांगितले.

धर्म, देवळे अन् धार्मिक तणाव हीच भाजपाची त्रिसूत्री, 2024 साठी 21 मंदिरांचा कॉरिडॉर; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मला क्रेडिट नको, सामान्य युवकांच्या हाताला काम द्यायचंय

आज सत्तेत आलात आणि तु्म्ही जर क्रेडिट घेणार असाल तर जरूर घ्या. ज्या एमआयडीसीचा पाठपुरावा त्यांनी नाही तर मी केला. त्याचं क्रेडिट त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी जीआर हातात घ्या, फोटो काढा, बातम्या छापा पण ते तरी करा. त्यांनी पाठपुरावा केला असेल तर पुढे या आपण मीडियासमोर चर्चा करू असे मी म्हणालो होतो पण ते काही पुढे आले नाहीत. त्यांना क्रेडिट घ्यायचं असेल तर घ्या मला राजकीय क्रेडिट घ्यायचं नाही. मला फक्त सामान्य लोकांच्या मुलांना त्यांच्या हाताला काम मिळवून द्यायचं आहे. हे जर तुम्ही (राम शिंदे) क्रेडिट घेऊन होणार असेल तरी काही हरकत नाही.

Tags

follow us

वेब स्टोरीज