Download App

“माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळेच, पोलिसांनीही..”, प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप

प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. या सर्व हल्ल्याचे मास्टरमाइंड महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत

Pravin Gaikwad Press Conference : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर (Pravin Gaikwad) हल्ला झाला होता. या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. यानंतर आता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. या सर्व हल्ल्याचे मास्टरमाइंड महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत (Chandrashekhar Bawankule) असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे. दीपक काटेवर मकोका लावण्याची गरज आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गायकवाड पुढे म्हणाले, हल्ल्याच्या कटाती रेकी मागील चार दिवसांपासून सुरू होती. स्वागताला आलेल्या लोकांत हल्लेखोर लपलेले होते. या प्रकरणीत दीपक काटे नावाच्या व्यक्तीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्यक्तीकडे शस्त्र आणि 28 काडतुसे सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दीपक काटेला मकोका लावण्याची गरज आहे असे गायकवाड यांनी सांगितले.

बावनकुळेच हल्ल्याचे मास्टरमाइंड

हल्लेखोरांनी माझ्यावर काळी शाई आणि विषारी वंगण तेल टाकलं. हा हल्ला थेट पुरोगामी विचारसरणीवर हल्ला होता. यानंतर गायकवाड यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला. चंद्रशेखर बावनकुळे हेच या हल्ल्याचे मास्टरमाइंड आहेत असा आरोप त्यांनी यासंदर्भात थेट ऑडिओ पुरावे देखील उपलब्ध असल्याचे सांगितले. बावनकुळेंनी वेळोवेळी दीपक काटेची पाठराखण केली. काटे बावनकुळेंना गॉडफादर मानतात असा दावा गायकवाड यांनी यावेळी केला.

प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे राज्यात पडसाद; मराठवाडा विद्यापीठात ‘एसएफआय’डून निदर्शने

या प्रकरणात दीपक काटे या व्यक्तीचं समोर आलं आहे. पुणे विमानतळावर त्यांच्याकडे शस्त्र आढळले होते. त्यामुळे काटेवर मकोका अंतर्गत कारवाई होण्याची गरज आहे. आर्म अॅक्ट अंतर्गत जामीन मिळणे कठीण असताना काटे बाहेर कसे फिरत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनीच दीपक काटेंना पाठबळ दिले. काटे त्यांना गॉडफादर मानतात. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस देखील दीपक काटेच्या पाठीशी उभे आहेत असा आरोप गायकवाड यांनी केला.

गायकवाड यांनी पोलिसांवरही हलगर्जीपणाचा आरोप केला. माझ्यावरील हल्ल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र त्यांनी तसं काहीच केलं नाही. या प्रकरणात पोलिसांनी योग्य कार्यवाही केली नाही. प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला. भाजपला पुरोगामी संघटनांची भीती वाटते म्हणूनच सामाजिक कार्यकर्त्यांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

Video : प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरण; सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत दोन गट भिडले

follow us