Video : प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरण; सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत दोन गट भिडले

Maratha Community Meeting Clashes In Solapur : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष (Solapur) प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे नुकताच हल्ला झाला. त्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. यातही प्रामुख्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांनी बैठक आयोजीत केली होती. मात्र, या बेठकीतच मोठा राडा झाला आहे.
या बैठकीला मोठ्या संख्येनं सोलापूर जिल्ह्यातून पदाधिकारी आले होते. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची आज सोलापुरात बैठक आयोजीत केली होती. दरम्यान, बैठक सुरु असतानाच अमोल राजे भोसले यांच्या विरोधात एका कार्यकर्त्याने वक्तव्य केलं. त्यानंतर अमोल राजे भोसले यांचे समर्थक कार्यकर्ते भडकले.
Video : मला जीवे मारण्याचा कट होता; हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया
त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला थेट मारहाण करायला सुरूवात झाली. या बैठकीत सर्वजण आपले विचार व्यक्त करत होते. त्यावेळी एका तरुणाने अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख अमोलराजे भोसले यांच्यावर टीका केली म्हणून एका तरुणाला मारहाण केली आहे. यामुळं बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
काय घडलं होत?
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर, भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे.
आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांनी बैठक आयोजीत केली होती. मात्र, या बेठकीतच मोठा राडा झाला आहे. #मराठासमाजबैठकसोलापूर #Solapur pic.twitter.com/O01BPJmMtH
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 15, 2025