Video : मला जीवे मारण्याचा कट होता; हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया

Video : मला जीवे मारण्याचा कट होता; हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया

Praveen Gaikwad Reaction on Attack : शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगण टाकलं आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. कधी पक्ष फोडले जातात, कार्यकर्ते फोडले जातात. मग त्यांच्या मनासारखी गोष्ट करता आली नाही, तर सत्य विचारसरणीने आम्ही कार्य करतो, आमचा विचार हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिली. ते हल्ला झाल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

देशात मानवता प्रस्थापित व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम सुरू आहे. आणि ते सुरू राहणार आहे. पण काही सामाजिक संघटनेबद्दल गैरसमज पसरवले जातात. मग हिंदुत्वादी विचारसरणीच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मी त्याचा निषेध करणार नाही. पण हे ज्यांनी पण घडवून आणले आहे, त्यांना निश्चितपणे सांगतो की, ही शेवटाची सुरुवात आहे, एवढं मी निश्चितपणे सांगतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, वाचा काय अन् कसं घडलं?

संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. राज्यकर्ते विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. आम्ही जेव्हा या कार्यक्रमाला पोचतो, तेव्हा पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती. मला असं वाटतंय की, जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती का? का ठरवून षडयंत्र घडलं होतं का? माझ्या जीविताला धोका होता का? मी माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे मी जीवंत आहे असंही ते यावेळी म्हणाले.

मला आनंद वाटतो की, मला चांगलं काम करण्याची संधी असल्यामुळे नवीन जीवनाची संधी मिळाली आहे असं म्हणत या घटनेला पुर्णपणे सरकार जबाबदार आहे असं म्हणत सरकारने यातील लोकांची चौकशी करावी असंही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, सरकारने याची जबाबदारी घ्यावी. कारण, हा मला मारण्याचा प्लॅन होता. त्यामुळे याची पुर्णपणे जबाबदारी सराकरची आहे असं म्हणत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी दखल घ्यावी असं म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या