Download App

सुप्रिया सुळेंचा मोठा दावा ! म्हणाल्या, 15 दिवसांत दोन राजकीय भूकंप एक दिल्लीत तर दुसरा…

Supriya Sule : राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार का, ते भाजपात जाणार का, आणि सरकार कोसळणार का ? हे कळीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. या प्रश्नांवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन मोठे स्फोट होणार आहेत, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनीही याबाबत एक मोठा दावा केला आहे.

त्यांच्या या दाव्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अजित पवार कुठे आहेत ?, असा प्रश्न सुळेंना विचारण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘तुम्ही त्यांच्या मागे जा, तुम्हाला समजेल ते कुठे आहेत. अनेक समस्या आहेत. राज्यात कामं होत नाहीत त्यामुळे काही कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले होते. एक कार्यक्रम रद्द केल्याने काही होत नाही’, असे त्यांनी म्हटले.

Gulabrao Patil On Udhav Thackery : मला मंत्री करताना तीन-चारदा तपासलं, स्वतः थेट मुख्यमंत्री झाले

अजित पवार भाजपात जाणार का,असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्या म्हणाल्या, गॉसिपसाठी माझ्याकडे वेळ नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. अजितदादा हे मेहनत करणारा माणूस आहे.

यानंतर दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या पंधरा दिवसात राज्याच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होतील असे म्हटले होते. त्यावर सुळे म्हणाल्या, एक नाही दोन राजकीय भूकंप होणार आहेत. एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू  आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही

Tags

follow us