Download App

Maharashtra Politics : पार्थ पडद्याआड मात्र, धाकटे सुपुत्र जय पवार अजितदादांच्या पाठीशी

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय हे दोन्ही पुत्र राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या बंडात पार्थ यांनी पडद्यामागे राहून अनेक सूत्रे फिरवली. तर दुसरे पुत्र जय हे आज अजित पवार यांच्या भाषणावेळी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत केलेल्या बंडामुळे पक्षातील वातावरण ढवळून निघाले असून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांचे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर कुरघोडी केली जात असून आमदारांची जमवाजमव केली जात आहे. आज (5 जुलै) अजित पवार गटाची एमआईटी इन्स्टिट्यूटमध्ये तर शरद पवार गटाची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक पार पडली. यावेळी सभेत पार्थ काही काळ कॅमेऱ्याच्या टप्प्यात आले. नंतर ते फारसे टीव्हीच्या पडद्यावर दिसले नाहीत. पार्थ समोरील सोफ्यावर बसल्याचे दिसून आले. मात्र जय हे अजित पवार यांच्या भाषणावेळी पूर्णवेळ पाठिशी होते. त्यांच्या भाषणाला ते टाळ्याही वाजवत होते.

या बंडासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या आहेत. यात पार्थ पवार यांनी पडद्यामागे राहून सूत्रे हलविली. सगळी राजकीय गणिते जुळवून आणण्यासाठी स्वतः पार्थ पवार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची भेट घेत होते. त्यांच्याशी चर्चा करत होते. यामागे काय रणनिती असेल याचाही आराखडा तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. अजितदादांचे निरोप नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला.

भाजपसोबतच जायचं तर पुरोगामी साहेबांचा चेहरा कशाला वापरता? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल

अजित पवार यांनी आजच्या सभेत आपला पक्ष विधानसभेच्या 90 तर लोकसभेच्या काही जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले. .यामध्ये पार्थ किंवा जय हे पण  आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे. पार्थ यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. ही जागा आता शिवसेनेकडे आहे. तेथून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपणच उमेदवार असल्याची घोषणा याआधीच केली आहे. अजित पवार हे आता शिवसेनेशी युतीत असल्याने मावळची जागा कोणाकडे राहणार याची उत्सुकता राहिल. विद्यमान खासदार यांनाच उमेदवारी मिळाली तर पार्थ यांच्यासाठी कोणता मतदारसंघ राहिल  याचीही चर्चा या मेळाव्याच्या निमित्ताने रंगली.

पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी पाठवले, फडणवीसांसोबत बैठका झाल्या; अजित पवारांचा गौप्यस्फोट

दरम्यान, राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज मुंबईत होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक झाली आहे. त्यांच्या समर्थक नेत्यांकडून शरद पवार आणि त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयावर सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार समर्थकांनी देखील अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केल्याने हा वाद आता किती विकोपाला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us