Download App

Video : ‘दिल्लीला गेलो नाही एवढंच सांगा’; न्यायालयाच्या निकालावर अजितदादांची मिश्कील प्रतिक्रिया

Ajit Pawar on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांना अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर आता या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सगळ्या घडामोडींवर महत्वाचे विधान केले आहे. न्यायालय काय निर्णय देईल याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला होता. न्यायालयाने दिलेल्या निकालातून त्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे.

अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अजित पवार म्हणाले, या प्रकरणी माहिती घेतल्याशिवाय काही बोलणार नाही. मात्र मी जे लातूरला बोललो होतो तसच घडलं आहे. मला जे काही बोलायचं ते उद्या बोलेन. फक्त मी दिल्लीला गेलो नाही एवढं सांगा, अशा मिश्कील शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला.

अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहणार असल्याचे सिद्ध झाले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज (दि.11 मे) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्या. कृष्णा कुमारी, न्या. हेमा कोहली आणि न्या. पी.एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणावर निकाल दिला.

दरम्यान, आता न्यायालयाचा निकाल आला आहे. त्यानंतर लागलीच मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालाचाली सुरू करण्यात आल्याचे कळते. एकूण १९ मंत्री शपथ घेण्याची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकेच नाही तर यावेळी मंत्र्यांच्या खात्यांचाही फेरबदल केला जाणार असल्याची माहिती आहे.

Bhagat Singh Koshyari On Udhav Thackeray : राजीनामा आल्यानंतर नका देऊ म्हणू का? तत्कालीन राज्यपाल कोश्यारींचा सवाल…

 

Tags

follow us