Bhagat Singh Koshyari On Udhav Thackeray : राजीनामा आल्यानंतर नका देऊ म्हणू का? तत्कालीन राज्यपाल कोश्यारींचा सवाल…
Bhagat Singh Koshyari On Udhav Thackeray : जेव्हा कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तेव्हा मी त्यांना राजीनामा देऊ नका असं म्हणू का? असा सवाल उपस्थित करीत सत्तासंघर्षावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निकालामध्ये माजी राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांचे चुकीचे अधिकार असल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. त्यावर कोश्यारींनी सवाल केला आहे.
IPL : इतिहास रचण्यापासून युझवेंद्र चहल एक पाऊल दूर, या दिग्गजांना टाकणार मागे
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, मागील तीन महिन्यांपासून मी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदापासून मुक्त झालो आहे. मी आता राजकीय घडामोडींना स्वत:पासून दूर ठेवत आहे, आज सर्वोच्च न्यायालायाने जो काही निर्णय दिला आहे, तो त्यांचा निर्णय असल्याचं कोश्यारींनी स्पष्ट केलंय.
Maharashtra Political Crisis : शिंदेंचे सरकार वाचले! ना अजितदादांची गरज ना ‘प्लॅन बी’ची आवश्यकता
तसेच सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयावर जे कायदेतज्ञ आहेत तेच सल्लामसल्लत करु शकतात. मी काही कायद्याचा विद्यार्थी नसल्याचं मला वाटत नसल्याचंही ते म्हणाले आहेत. मी फक्त संसदीय कार्यपद्धतीची माहिती ठेवतो, त्यानूसार मी त्या परिस्थितीत जी काही पाऊले उचलली ती विचारपूर्वक उचलली असून जेव्हा कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तेव्हा मी त्यांना राजीनामा नका देऊ म्हणू का? असं म्हणू का? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला आहे.
निर्णयात चुकलेले कोश्यारी थेट काशीत; निकालावेळी न्यायालयाने वाचला चुकांचा पाढा
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये राज्यापालांचे अधिकार चुकीचं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटलं त्यावर बरोबर काय चुकीचं काय याचं चिंतन करण्याचं काम माझं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या निर्णयांवरून कडक शब्दांत फटकारलं. राज्यपाल म्हणून उचललेल्या पावलांविषयी निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने कोश्यारींच्या चुकांचा पाढा वाचून दाखवला आहे.