Download App

माणिकराव कोकाटेंची खुर्ची जाणार? पडद्यामागे हालचाली अन् विचार सुरू; नवा कृषिमंत्री कोण..

सूत्रांकडील माहितीनुसार कोकाटे यांचे कृषी खाते मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना दिले जाण्याची शक्यता आहे.

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या वादग्रस्त (Manikrao Kokate) वक्तव्यांमुळे चर्चेत होते. परंतु, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केला. यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ उठलं. ठिकठिकाणी आंदोलने झाली. अजित पवार गटाच्या नेत्यांसमोर पत्ते उधळण्यात आले. सत्ताधाऱ्यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

कोकाटे यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. मात्र मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही असे मंत्री कोकाटे यांनी ठणकावून सांगितले आहे. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता कोकाटेंची खुर्ची जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यात किती तथ्य आहे याचा अंदाज येत नाही. मात्र सूत्रांकडील माहितीनुसार कोकाटे यांचे कृषी खाते मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना दिले जाण्याची शक्यता आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू झाला आहे.

मारकुटा सूरज चव्हाण पोलिसांनी शरण रातोरात जामीनही मंजूर; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

माणिकरावांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अन् अजितदादांची कोंडी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे महायुती सरकार आणि खुद्द पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचीही कोंडी झाली आहे. सरकार भिकारी आहे या त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यानेही मोठा गदारोळ उठला. विधीमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्याने तर वादळच उठलं. यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत. परंतु, दोन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मी राजीनामा देणार नाही असे स्पष्ट केले होते. याचवेळी त्यांनी शेतकरी नाही तर सरकार भिकारी आहे असं वक्तव्य केलं.

कोकाटे यांनी अद्याप राजीनामा दिला नसला तरी त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटे यांच्या सरकार भिकारी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवार या सगळ्याच प्रकरणात बॅकफूटवर गेले आहेत. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली म्हणून राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा तत्काळ राजीनामा घेतला. धनंजय मुंडे यांचाही मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला. मग आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेतला जाणार असा प्रश्न विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

“सरकार भिकारी, शेतकरी नाही”, कृषिमंत्री कोकाटेंच्या वक्तव्याने खळबळ; फडणवीसांनी टोचले कान

दरम्यान, माणिकरावांना आता आणखी पाठिशी घालायचे नाही असे राष्ट्रवादीत ठरल्याची माहिती आहे. आज कोकाटे अजितदादांची भेट घेण्यासाठी मुंबईत येणार होते. दुपारी तीन वाजता दोन्ही नेत्यांची बैठक ठरली होती. मात्र त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला. अजितदादांनीच कोकाटेंना भेट नाकारल्याने आता कोकाटे यांची गच्छंती अटळ असल्याचे सांगितले जात आहे.

follow us