Ajit Pawar : रोहित पवार, सुप्रिया सुळेंमुळेच अजितदादा शरद पवारांपासून लांब; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

Ajit Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजितदादांबरोबर (Ajit Pawar) आणखीही काही आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. आता अजित पवारांचा गट भाजपाच्या नेतृत्वातील सरकारमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. दोन्ही गटातील तणाव मात्र वाढला आहे. यातच आता शिंदे गटाच्या नेत्याने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh […]

Rohit Pawar, Ajit Pawar, Sharad Pawar

Rohit Pawar, Ajit Pawar, Sharad Pawar

Ajit Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजितदादांबरोबर (Ajit Pawar) आणखीही काही आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. आता अजित पवारांचा गट भाजपाच्या नेतृत्वातील सरकारमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. दोन्ही गटातील तणाव मात्र वाढला आहे. यातच आता शिंदे गटाच्या नेत्याने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले, की रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामुळे अजितदादांसारखा माणूस शरद पवारांपासून लांब गेला. प्रथम बारामतीमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं काय होईल याकडे लक्ष द्यावे मग श्रीकांत शिंदेंचं काय होणार याची काळजी करावी. रोहित पवारांची अवस्था काय आहे हे येणाऱ्या निवडणुकीत कळेलच. तुम्ही अजितदादा आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वासमोर आपण आधी बारामतीमधून लढून दाखवा त्यानंतर आम्हाला आव्हान द्या.

‘अथर्वशीर्ष म्हणताना महिलांना भिडेवाड्यात..,’; छगन भुजबळांनी व्यक्त केली खंत…

यानंतर म्हस्के यांनी नागपूर शहरातील पूरस्थितीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. राऊत हे नेहमीच बाष्कळ बडबड करत असतात. ज्यावेळी दुसऱ्यावर बोलतो त्यावेळी चार बोटे आपल्याकडे असतात याचा विचार त्यांनी करावा. नागपुरात चार तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आपलं काय. मुंबईत 24 वर्षे सत्ता होता त्यावेळी थोडा जरी पाऊस झाला तरी मुंबई पाण्यात बुडायची. लोकल  सेवा ठप्प व्हायची. पण, यावेळी असं झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं त्यामुळे मुंबई कुठेही तुंबली नाही, असे म्हस्के म्हणाले.

Exit mobile version