Download App

भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट ! राणेंनी दिली होती ऑफर पण, मी…

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. टीका करतानाही भाषेचे ताळतंत्र दोघांकडून ठेवले जात नसल्याचे अनेकदा दिसते. मात्र असे असले तरी राणे आणि जाधव यांच्यातील हे वैर कायम स्वरुपी असेच होते असे नाही. याचा खुलासा खुद्द आमदार भास्कर जाधव यांनीच केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा करत नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मला काँग्रेस (Congress) प्रवेशाची ऑफरही दिली होती असा गौप्यस्फोट केला.

वाचा : Uday Samant : गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक कुठुनही लढेल; भास्कर जाधव असे काेणाबाबत म्हणाले ? 

जाधव म्हणाले, की नारायण राणे आणि माझे काहीच वैर नाही. मी राणे यांच्या आधीच शिवसेना सोडली होती. माझ्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी त्यांना असे वाटत होते की मी त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये यावे पण मी प्रत्येकवेळी हसण्यावारी नेऊन टाळत होतो. काँग्रेसमध्ये गेल्यावर राणे मुख्यमंत्री होणार अशा बातम्या रोजच येत होत्या. त्यानंतर एक दिवशी त्यांनी मला बोलावले आणि मला म्हणाले, की मी आता आठ दिवसात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तेव्हा तुम्हाला यायचे असेल तर आताच या. नंतर नी मुख्यमंत्री झाल्यावर मात्र मला काहीही करता येणार नाही.

त्यावर मी त्यांना म्हणालो, की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मोठे व्हा तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही. तुम्हाला काही मागायलाही येणार नाही. याचे कारण म्हणजे मी आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे लगेचच हा पक्ष मला सोडता येणार नाही असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर सुद्धा आमचे संबंध चांगलेच राहिले.

Bhaskar Jadhav : दापोलीत पुढचा आमदार ठाकरे गटाचाच होणार, भास्कर जाधव यांचा निर्धार

असा सुरू झाला संघर्ष

त्यानंतर मात्र एक दिवशी मी त्यांच्या मुलांना काहीतरी चुकीचे बोललो असे समजून त्यांनी माझे कार्यालय फोडले. तुम्ही जर माझे कार्यालय फोडणार असाल तुमच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे मस्ती आहे तर या भास्कर जाधवकडे स्वाभिमान आहे असे ठणकावून सांगितले. येथून पुढे राजकीय संघर्ष वाढत गेला. नारायण राणे यांची मुले तर कुणालाही काहीही बोलतात. त्यांना आजिबात ताळतंत्र नाही. आम्हालाही मुले आहेत. आमच्या मुलांबद्दल कधी कुठे तक्रारी होतात का, असा सवाल त्यांनी केला. राणे यांची जी मुले आहेत ती कुणाला तरी सोडतात का, काहीही बोलत असतात.

Tags

follow us