Bhaskar Jadhav : दापोलीत पुढचा आमदार ठाकरे गटाचाच होणार, भास्कर जाधव यांचा निर्धार

Bhaskar Jadhav : दापोलीत पुढचा आमदार ठाकरे गटाचाच होणार, भास्कर जाधव यांचा निर्धार

रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या अती बोलण्यामुळं मी ठरवलंय की, काय वाट्टेल ते झालं तरी चालेल पण दापोली-खेडमधील पुढचा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच करायचा असा निर्धार ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केला आहे. आपण रामदास कदम यांचं राजकीय ऑपरेशन (Political Operation) करणार असल्याचं यावेळी सांगितलं. रामदास कदम यांना त्यांचं ऑपरेशन झाल्याचंही समजणार नाही. रामदास कदम यांची मागील भाषणं पाहिली तर त्यात तेच तेच मुद्दे आहेत. त्यामध्ये योगेशला संपवायचंय, आम्हाला काय दिलं? उद्धव ठाकरे यांनी मराठी माणूस संपवला असे मुद्दे आहेत. रत्नागिरी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. सेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचं सत्र सुरुच आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. सध्या योगेश रामदास कदम हे आमदार असलेल्या मतदार संघात ठाकरे गटाचा आमदार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं यावेळी भास्कर जाधव यांनी सांगितलं.

आमदार जाधव म्हणाले की, आपण स्वतःच ठरवलं आहे. पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असणार आहे. त्याची जबाबदारी आपण घेतली आहे. मी त्यासाठी चांगली गोळाबेरीज करत आहे. आपण आपल्या राजकीय जीवणामध्ये जे काही करायचं असेल त्याचा गाजावाजा करत नाही पण एखाद्याचं ऑपरेशन असं करतो की त्याचं ऑपरेशन होईपर्यंत त्याला काहीच कळत नाही, असा टोला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube