Nitesh Rane : ‘हिच ती वेळ.. काय ते उद्या बोलू..’ नितेश राणेंच्या ‘त्या’ ट्विटचा रोख कुणाकडे?

Nitesh Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचा दाखला देत आम्ही जर तुमच्या परिवारावर बोललो तर तु्म्हाला झेपणार नाही. त्यामुळे परिवारावर बोलणं बंद करा, असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यावर […]

Nitesh Rane : शरद पवारच नाही, ठाकरे गटही कॉंग्रेसमध्ये विलीन होणार; राणेंचा दावा

Nitesh Rane

Nitesh Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचा दाखला देत आम्ही जर तुमच्या परिवारावर बोललो तर तु्म्हाला झेपणार नाही. त्यामुळे परिवारावर बोलणं बंद करा, असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यावर आता भाजप नेत्यांनी टीका केली आहे. भाजप आ. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सूचक ट्विट करत उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

राणे यांनी एक ट्विट केले आहे. ‘हिच ती वेळ… वैभव चेंम्बर्सचे सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्डिंग रिलीज करण्यााची! बाकी उद्याच्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलूच.’ असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नितेश राणे कोणता गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवरावर बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसन तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, असा गर्भित इशारा देत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

काल मी बैठकीला गेलो होतो. त्यावर लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवरावर बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसन तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल.

चर्चा तर होणारच! थोरातांचे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागले, विखेंनी दिल्या खोचक शुभेच्छा

Exit mobile version